मुख्य बातम्या:

अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला

मोहाडी,दि.19(विशेष प्रतिनिधी)ः-भंडारा जिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात अवैधरित्या वाळूची वाहतूक टिप्परच्या माध्यमातून सुरु असतानाही त्यावर महसुल व पोलिस विभागाचे कुठेच अंकुश नसल्यामुळेच मोहाडी तालुक्यातील रोहणा येथे आज सकाळच्या सुमारास एका वाळू वाहून नेणाऱ्या टिप्परच्या चाकात येऊन सायकलस्वार शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.मृत शेतकऱ्याचे नाव रुपचंद आगाशे(वय 65) राहणार रोहणा असे आहे.रुपचंद आगाशे हे सायकलने जात असताना रोहणा गावाजवळील रस्त्यावरुन अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने ते मागच्या चाकात आले.या घटनेने घटनास्थळावर मोठा रोष जनतेत उफाळून आलेला असून परिस्थिती स्पोटक झालेली आहे.पोलीस घटनास्थळावर पोचली असून पोलीसासंह महसूल अधिकारीविरोधात नागरिकांत रोष दिसून येत आहे.

Share