मुख्य बातम्या:
खजरी/डोंगरगांव येथील आदिवासी विकास विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात# #मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी द्यावी-ऊर्जामंत्री# #एक शाम राष्ट्र के नाम' कवि संमेलन आज - भाजयुमोचे आयोजन# #तिरंग्या”नं दिला स्वयंरोजगार ! बांबूपासून बनवलेला तिरंगा देश-विदेशात# #अर्जुनी मोर व साकोली पं.स.च्या नव्या इमारत बांधकामाला मंजुरी# #सिरोंचा येथील युवकांची राष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता निवड# #संघी टाॅपर्स अवॉर्ड समारोह ४ फेब्रुवारीला# #समाजाच्या प्रगतीसाठी संघठीत होणे गरजेचे : खनिज मंत्री जायसवाल# #स्वच्छ शौचालय स्पर्धेत सहभागी होऊन पुरस्कार मिळावा# #आर्थिक लाभासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी,शासनाची दिशाभूल-राकेश ठाकुर

गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट

गडचिरोली(अशोक दुर्गम) दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला न्याय द्यावा, यासाठी आदिवासी गोवारी समाज संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या सत्याग्रह आंदोलनासा गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांनी भेट देऊन निवेदन स्विकारले.तसेच गोवारी समाजाची मागणी योग्य असल्याने समाजाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचवू असे आश्वासन दिले.त्यानंतर समाज संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फेत राज्याचे राज्यपाल,मुख्यमंत्री व मुख्य सचिवांच्या नावे असलेले निवेदन पाठविण्यात आले.
आदिवासी गोवारी जमातीचा प्रश्न मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक संस्था, संघटनांनी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र शासन गोवारी समाजाला न्याय देण्यास टाळाटाळ करीत आहे. शासनाने निर्णयाची अंबलबजावणी तत्काळ करावी व गोवारी जमातीला न्याय द्यावा म्हणून समन्वय समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा समन्वयक डेडूजी राऊत,नाना ठाकूर,श्रावण नागोसे,ज्ञानेश्वर नेवारे,पार्वती चालकी,हरिष कुज्जामी,मानवत राणा,हेमंत शेंद्रे यांनी केले.आंदोलनात जिल्हायातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share