पोलीस स्मृती दिनाचे आज आयोजन

0
7

वाशिम/गोंदिया, दि. २० : कर्तव्य पार पाडत असताना आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शूर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्मरण करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने रविवार, २१ ऑक्टोंबर २०१८ रोजी सकाळी ७.१५ वाजता वाशिम येथील नवीन पोलीस मुख्यालय व गोंदिया जिल्ह्यातील कारंजा पोलीस मुख्यालयात येथे पोलीस स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. वाशिम येथील कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा हे उपस्थित राहणार आहेत, तर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे.तसेच गोंदिया येथील कार्यक्रमाला पोलीस अधिक्षक हरिष बैजल उपस्थित राहणार आहेत.