राज्य राखीव पोलिस दलाची व्हॅन उलटून २० जवान जखमी

0
20

यवतमाळ,दि.20: पुसद येथील दुर्गा देवीच्या विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी जात असलेली राज्य राखीव पोलीस दलाची व्हॅन उलटून झालेल्या अपघातात २० जवान जखमी झाले आहेत. हा अपघात पुसद-हिंगोली मार्गावर आज शनिवारी दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान झाला. हिंगोलीकडून पुसदकडे निघालेली ही गाडी खांडवा-मांडवा या घाटातून जात असताना अनियंत्रित होऊन उलटली. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. जखमी जवानांना पुसद येथील रुग्णालयात दाखल केले आहे.