सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन

0
12

वाशिम, दि. ३१ : देशाचे पहिले उप प्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे व जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.यावेळी प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा विधी अधिकारी महेश महामुने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.