युवकांच्या सुप्त गुणाला प्रोत्साहनासाठी ‘सीएम चषक‘ : ना. बडोले 

0
15
गोंदिया,दि. ३१ः-ग्रामीण भागात अनेक युवक, दर्जेदार खेळाडू व कलावंत आहेत. परंतु त्यांना योग्य मंच मिळत नसल्याचे त्यांची प्रतिभा ही झाकोळली जाते. त्यामुळे त्यांची ही प्रतिभा पुढे येण्यासाठी ‘सीएम चषकङ्क हे एक मोठे माध्यम ठरणार असून या माध्यमातून जिल्ह्यातील युवक व युवतींना भविष्याच्या वाटाही निश्चित करण्यात मोठी मदत होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी केले.
ते मंगळवार, ३० ऑक्टोबर रोजी सडक अर्जुनी येथील भाजपा कार्यालयात आयोजित सीएम चषक आढावा बैठकीत बोलत होते. पुढे बोलताना ना. बडोले म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील युवक, खेळाडू व कलावतांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या कलागुणांना भविष्यात वाव मिळावा, या उद्देशाने ‘भविष्य युवांचा..भविष्य खेळाडूंचा..ङ्क ही संकल्पना समोर ठेवून जिल्हा भारतीय युवा मोर्चाच्या वतीने ११ नोव्हेंबर पासून ‘सीएम चषकङ्क हा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात येत आहे. ११ नोव्हेंबरपासून या उपक्रमातंर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान नावनोंदणीचा कालावधी आहे. दोन गटात घेण्यात येणाèया या उपक्रमातंर्गत आयुष्यमान भारत व शेतकरी सन्मान या नावाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात क्रिकेट, कबड्डी या स्पर्धा एकूण सहा झोनमध्ये घेण्यात येणार असून प्रत्येक झोनमध्ये क्रिकेट स्पर्धेतील प्रथम विजेत्याला ११ हजार व व्दितीय विजेत्याला ७ हजार रुपये पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच कबड्डी स्पर्धेत महिला व पुरुष संघ विजेत्यांना अनुक्रमे प्रथम ११ हजार व व्दितीय ७ हजार रुपये पुरस्कार देण्यात येईल. क्रिकेट स्पर्धेचे आयोजन अर्जुनी मोर जिप शाळेचे पटांगण, सौंदड, डव्वा, कमरगाव, नवेगावबांध येथील हेसीपॅड ग्राऊंड व महागाव येथील श्यामाप्रसाद विद्यालय येथील मैदानावर करण्यात आले आहे. तर कबड्डी स्पर्धेचे आयोजन कोहलगाव, केशोरी, अरततोंडी/दाभना, खोबा, कोसमतोंडी, मुंडीपार/भडंगा येथील मैदानावर करण्यात आले आहे. याशिवाय विधानसभा निहाय जलयुक्त शिवार योजनेच्या नावाने व्हॉलीबॉल स्पर्धा १५ नोव्हेंबर रोजी जिप शाळा अर्जुनी मोर येथे, मेक इन इंडिया नावाने रांगोळी स्पर्धा १६ नोव्हेंबर रोजी आयटीआय सडक अर्जुनी येथे, दौड स्पर्धा १७ नोव्हेंबर रोजी सडक अर्जुनी येथे, उज्वला योजनेच्या नावाने नृत्य व गायन स्पर्धा १८ नोव्हेंबर रोजी अर्जुनी मोर पंचायल समितीसमोरील मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धेत प्रथम व व्दितीय विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार व ७ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेत नावनोंदणी व अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील आठही तालुका भाजपा कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन ना. बडोले यांनी केले आहे.