घरफोडीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सजग रहावे : डॉ. शिंदे

0
8

नांदेड,दि.02 : सध्या शहर व जिल्ह्यात घरफोडीचे प्रमाण वाढत असून त्यावर मात करण्यासाठी नागरिकांनी सजग राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी केले आहे.सध्या सणासुदीचे दिवस असून, शाळा, महाविद्यालयांना सुटी असल्याने शहरातील अनेकजण आपल्या मूळ गावी परिवारासह नातेवाईकांकडे जात असतात. याचा फायदा अज्ञात चोरटे घेतात. बाहेरगावी जाताना नागरिकांनी सजग राहणे आवश्‍यक आहे.

बाहेरगावी जाताना ही घ्या काळजी –

– आपल्या शेजारी राहणाऱ्यांना सांगा. घराला चांगल्या दर्जाचे कुलूप लावा.

– घरात सोन्या- चांदीचे दागिणे किंवा किमती वस्तू ठेवू नका.

– किंमती वस्तू किंवा दागिणे बँक लॉकरमध्ये ठेवा.

– घरातील पंखा आणि विजेचा दिवा शक्यतो सुरू ठेवा.

–  जेणेकरून चोरट्यांना घरात कुणीतरी आहे याचा भास होईल व घरफोडी होणार नाही.

– घर ज्या ठाण्याच्या हद्दीत आहे, त्या ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरगावी जात असल्याची सूचना द्या.

– सोसायटीमध्ये असताना शेजारी हाच खरा रक्षक असतो म्हणून त्यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करा.

– वॉचमन ठेवून त्याला सुचना द्या, तसेच आपल्या भागात कोणी संशयित किंवा अनोळखी व्यक्ती फिरत असेल तर त्याला हटका, काम विचारा नाहीतर संबंधित ठाण्याला फोन लावा.

– फेरीवाले, भंगार जमा करणाऱ्या लोकांवर नजर ठेणे गरजेचे आहे.

– शक्य झाल्यास सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. जेणेकरून एखादी घरोडी झाल्यास चोरट्याचा माग काढण्यास पोलिसांना सोपे जाईल आणि चोरटा जाळ्यात अडकेल.

– आपण बाहेरगावी असाल तर दिवसांतून एकदा तरी शेजाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क करा.

– सोसायटीत पोलिसांसोबत गस्त घालण्यासाठी एक टीम तयार करा. यासह आदी सूचनांचे पालन नागरिकांनी केल्यास वाढत्या घरफोडीवर प्रतिबंध घालता येईल.