महिला लिपिकाची नायब तहसिलदाराला मारहाण,कामबंद आंदोलन

0
13

सालेकसा,दि.07 : येथील तहसील कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने नायब तहसीलदारवर चप्पलने मारल्याची घटना सोमवारी (दि.५) घडली. या घटनेच्या निषेर्धात तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (दि.६) कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे तहसील कार्यालयातील सर्व कामे ठप्प पडली आहे. तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले.
सोमवारी (दि.५) कार्यालयीन वेळेत तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी काम करीत होती. कार्यालयातील महिला कर्मचारी वर्षा वाढई यांच्याकडे इंदिरा गांधी योजनेचा अतिरिक्त कार्यभार असल्याने व दिवाळीपूर्वी सदर योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान पाठविणे अनिवार्य होते. त्यामुळे प्रभारी अधिकारी तथा नायब तहसीलदार संजय गांधी योजना आय. आर. पांडे यांनी वाढई यांना इंदिरा गांधी योजनेच्या बिलाबाबत विचारणा केली. तुम्ही त्या दिवशीच बिल तयार करणार होते. परंतु अद्यापही कोणत्याही प्रकारचे बिल तयार केले नाही असे म्हणून ते परत जात असताना वाढई यांनी पायातील चप्पल काढून मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच वाढई यांच्या मुलांने सुध्दा पांडे यांना मारहाण केली.या सर्व प्रकारामुळे कार्यालयात उपस्थित अधिकारी व कर्मचारी काही क्षण अवाक झाले. यापूर्वी सुद्धा मागील लोकसभा पोट निवडणुकीच्या दरम्यान आस्थापना एका लिपिकाला अश्याच प्रकारे मारहाण केली होती. त्यामुळे कार्यालयातील कोणत्याही अधिकारी व कर्मचाºयांसोबत असा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तहसील कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे वाढई यांच्यावर शासन नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. जोपर्यंत वाढई यांच्यावर कार्यवाही होत नाही, तोपर्यंत सर्व नायब तहसीलदार अधिकारी, कर्मचारी आणि महसूलचे सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन सुरुच ठेवणार असा ईशारा दिला आहे. यासंबंधिचे निवेदन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, विभागीय आयुक्त नागपूर, उपविभागीय अधिकारी देवरी, तहसीलदार सालेकसा, ठाणेदार सालेकसा यांना दिले आहे.
शिष्टमंडळात नायब तहसीलदार आ.आर.पांडे, नायब तहसीलदार, ए. बी. भुरे, एस. व्ही. गजभिये, पी. सी. बावणे, एम. सी. बावणे, एच. बी. मडावी, आर.एच.ढगे, डी.एस.बावणकर, संदेश हलमारे, सी.जी. केरवतकर, केशरबाई तुमसरे,टी.टी.गिऱ्हेपुंजे, जी.एस.कावडे, अस्पाक सैय्यद, संदेश बोरकर, जी. एच.राऊत,श्रीणू वई, शामलाल मडावी, सुनील उपराडे, अमित रहिले, ऋषीकुमार कुंभरे, एम.आर.डोंगरे, सुनील नागपुरे,अशोक डोंगरवार, विठ्ठल राठोड यांचा समावेश होता.