एक अवलिया डॉक्टर  बाबुराव फुंडे 

0
18
स्व. मनोहर पटेलांचेही मोलाचे योगदान
आजपासून बरोबर साठ वर्षा आधीची तालुका साकोली मौजे पिंपळगाव येथील एक काळोखी रात्र. पिपंळगावच्या बाजूच्या गावातून मध्यरात्री भर पावसात एक इसम धापा टाकत, भेलकाडत पिंपळगावच्या सार्वजनिक दवाखाण्यात दाखल झाला. मोठ -मोठयाने दवाखाण्याचे दार बडवू लागला. मदतीची याचना करू लागला. बाजूच्या गावात त्याची पत्नी प्रसुती समयी अडली होती. स्थानिक दाई बायांनी हात वर केले होते. प्रसंग मोठा दूर्धर होता. पोटूशी बाई आणि तिच्या गर्भातील बाळाला धोका निर्माण झाला होता. दोन्ही जिव वाचणार नाही असे बोलले जात होते. यात एकच पर्याय पिंपळगावचे डॉक्टर.
 मोठयाने दार बडवल्यावर आतून एका तरूण डॉक्टरने दार उघडले. दारावर उभ्या असलेल्या इसमाची वैâफीत ऐकली आणि आपली दवाखाण्याची पेटी उचलून गुमान त्या इसमाच्या मागे चालते झाले. त्याच्या गावात जावून गर्भवती महिलेची सुखरूप सुटका केली. एक गोंडस बाळ जन्माला आले. जचका आणि बचका दोन्ही ठिक होते. सर्व ‘ाई आनंद पसरला. संबंध गावातले लोक त्या तरूण डॉक्टरची करूणा भाकू लागले.  दुसर्‍या दिवशी ती बातमी पंचक्रोशीत पसरली. हे होते पिंपळगावच्या शासकीय दवाखाण्याचे पहिले डॉक्टर बाबुराव सोमाजी फुंडे.
पिंपळगावचे पहिले सरपंच नत्थुजी तरोणे यांना गावाचा विकास करायचा होता, महात्मा गांधी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर एका आदर्श गावाची निर्मीती नत्थुजी तरोणे यांना कराची होती. मुलभूत सेवांबराबरच आरोग्यांचा प्रश्न मोठाहोता. आजपासून साठ वर्षाआधी गावात दवाखाने नव्हते. ग्रामस्थांना शहरात यायला रस्ता आणि साधने नव्हती. जनन दरापेक्षा मरणदर अधिक होते. अशात गावातच सरपंच नत्थुजी तरोणे व बाबुरावजी फुंडे यांनी मनोहर पटेल यांना स्वत: भेटून तिथल्या परिस्थितीची माहिती सांगितली. लागलीच मनोहर पटेल हे गावात येवून गावाची परिस्थिती पाहिली. आणि त्यावेळी मनोहरभाई पटेल यांनी आपल्या पत्नीच्या नावे याठिकृाणी सृतिका गृह उभारून  दिलेले  खा.प्रफुल्ल पटेल यांच्या वडीलांना विसरता येणार नाही. कारण त्यांचा मोलाचा वाटा  याठिकाणी आहे.
लोकसहभागातून व लोकवर्गनितून दवाखाना बांधण्याचा अविश्वसनिय विचार नत्थुजी तरोणे यांनी केला. आणि १९५७ ला पिंपळगाव येथे लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून पहिला शासकीय दवाखाना सुरू झाला. या दवाखाण्याला पहिले डॉक्टर म्हणून बाबूराव सोमाजी फुंडे यांची नियुक्ती झाली. तब्बल ११ वर्ष डॉ. बाबूराव फुंडे यांनी आपली सेवा पिंपळगाव, लाखांदूर, किटाळी, आणि बेलाटी येथील आसपासच्या खेड्यांना दिली.
वैद्यकीय सेवेचे व्रत घेतलेले बाबुराव फुंडे हे अवलिया डॉक्टर होते असेच म्हणावे लागेल. ‘ड्यिुटी अर्वस’ कामाच्या वेळा सोडूनही ते रूग्णांना आपली सेवा द्यायचे. रूग्णांच्या गावी जावून त्यांचे रोगनिदान करायचे. पैसे कधी मागीतले नाही. ज्याने दिले, जितके दिले तितके घेतले. नाहीतर नाही, असा त्यांचा कित्ता होता. विशेष आर्श्चयाची बाब म्हणजे सा’ वर्षाच्या आधी पिंपळगाव सारख्या दुर्गम समजल्या जाणार्‍या गावात बाबुराव फुंडे यांच्या दवाखाण्यात एक प्रसुती कक्ष होता. पंचकृषीतल्या सगळ्या बायांची प्रसुती याच दवाखाण्यात डॉ. बाबुराव फुंडे यांनी यशस्वीरित्या केली. आजसारखा सिजर नावाचा प्रकार तेव्हा नव्हता. अत्यंत तोकड्या वैद्यकीय साधणांवर डॉ. बाबुराव फुंडे यांनी कितीतरी क्रिटीकल प्रसुती केल्या. त्यामुळे पिंपळगाव आणि परिसरात डॉ. फुंडे यांना देवासारखे माणले जाई.
पिंपळगावला ११ वर्ष वैद्यकीय सेवा दिल्यानंतर डॉ. फुंडे यांची पालांदूर, किटाळी,बेलाटी तालुका पवनी येथे बदली झाली. तेथे ही डॉ. फुंडे यांनी भरपूर सेवा दिली. विशेष म्हणजे या काळात कुटूंब नियोजनाची शासनाची योजना डॉ. बाबुराव फुंडे यांनी यशस्वीरित्या राबविली. स्वातंत्र्योतर काळात देशाच्या प्रगतीला विशेष चालणा देण्यासा’ी विविध आघाड्यांवर देशाच्या विकासासा’ी काम सुरू झाले. यात वाढत्या लोकसंख्येला आळा आणि कुटूंब लहान असतील तर कुटूंबाचा विकास बरोबरीने माणसाचा व राष्ट्राचा विकास हे धोरण घेवून कुटूंब कल्याणाचे काम मो’्या प्रमाणावर देशभर सुरू झाले. ग्रामीण क्षेत्रात निरक्षरतेपायी कुटूंब नियोजन कोणीही करत नव्हते. डॉ. फुंडे यांनी माणसाच्या, कुटूंबाच्या आणि पर्यायी देशाच्या सर्वांगीणी विकासाच्या उद्देशाने कुटूंब नियोजनाचे कार्य शिरावर घेतले. आणि ग्रामीण क्षेत्रात उत्तमपणे राबविले. म्हणून जिल्हा परिषद भंडारा तर्पेâ डॉ. बाबुराव फुंडे यांचा सतत २१ वर्ष प्रशस्ती पत्र देवून सत्कार व गौरव करण्यात आला. सतत २१ वर्ष एका विशिष्ट विषयाला घेवून सत्कार होणारे डॉ. बाबूराव फुंडे हे आतापर्यंतचे पहिले डॉक्टर आहेत.
या त्यांच्या वैद्यकीय प्रवासात त्यांनी आपले स्थायी घर पिंपळगाव येथे केले. त्यांच्या घरात आजही त्यांच्या सेवाकार्याबद्दल अनेक प्रशस्ती पत्रक आढळून येतात. केवळ व्यवसायानी डॉक्टर नसून पूर्ण अर्थानी सेवाभावी डॉक्टर म्हणून डॉ. बाबूराव सोमाजी  फुंडे यांनी आपली अख्खी हयात घालवली. या डॉक्टर बाबुराव फुंडे यांच्या संसारवेलीवर तीन मुले व दोन मुली अशी फुले ऊमलली.  पण दुसरा म्ाुलगा सहकार क्षेत्रातील एक दिग्गज नाव ते म्हणजे सुनिल बाबुराव फुंडे म्हणजे सर्वाचा लाडका सुनिलभाऊ.