केंद्रियमंत्री अनंतकुमार यांचे निधन

0
8

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी आज मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. ते 59 वर्षांचे होते. बंगळुरुमधून ते सहावेळा भाजपाच्या तिकिटावर लोकसभेवर गेले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. मात्र ती अपयशी ठरली.
अनंत कुमार यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे व्यक्त केली. ‘माझे मित्र आणि सहकारी अनंत कुमार यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले आहे. ते अतिशय असामान्य नेते होते. तरुणपणीच ते समाजकारणात सक्रीय झाले. त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी अनंत कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. मोदींनी अनंत कुमार यांच्या पत्नी तेजस्विनी यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. कुमार कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अनंत कुमार यांना श्रद्धांजली वाहिली.

Narendra Modi