लिंगापूर येथे शनिवारी ऊस उत्पादक व रब्बी हंगाम पीक मार्गदर्शन मेळावा

0
12
तामसा,दि.14_- शेतकऱ्यांना ऊस,हरभरा,गहू,व हळद या पिकावर मार्गदर्शन करण्यासाठी भव्य ऊस उत्पादक व रब्बी हंगाम मार्गदर्शन मेळावा शनिवार 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता लिंगापुर ता.हादगाव येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक,पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा शेतकरी सल्लागार मंडळ आत्माचे सदस्य भागवत देवसरकर यांनी दिली आहे.
आष्टी,तामसा व परिसरातील शेतकरी बांधवासाठी लिंगापूर येथे ऊस उत्पादक शेतकरी व रब्बी हंगाम पीक मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन केले आहे.मेळाव्यात शेतकरी बांधवांना ऊस,गहू,हरभरा,हळद या पिकाच्या उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान व सखोल मार्गदर्शन, विस्तृत माहिती शास्त्रज्ञ करणार आहेत.मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक सांगली येथील,एकरी 120 टन ऊस काढणारे शेतकरी,नामवंत ऊस व्यवस्थापन मार्गदर्शक, कृषीभूषण संजीव माने यांचं ऊस पिकावर लागवड ते काढणी पर्यंत मार्गदर्शन करणार आहेत.तर गहू, हरभरा,हळद या पिकावर कृषी विज्ञान केंद्र,पोखर्णी चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ देवीकांत देशमुख यांच मार्गदर्शन लाभणार आहे. उद्घघाटन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, करणार असून अध्यक्षस्थानी नांदेडचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे असणार आहेत.
मेळाव्यास परिसरातील शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद तथा शेतकरी सल्लागार मंडळ,आत्माचे सदस्य आयोजक भागवत देवसरकर यांनी केले आहे.