नागरी पतसंस्थेने केली ग्राहक, अभिकर्त्यांची फसवणूक

0
20

गोंदिया,दि.17ः- स्थानिक श्री टॉकीज चौकात असलेल्या गोंदिया नागरी सहकारी पतसंस्था र्मया.र.नं.७२३ च्या माध्यमातून ग्राहकांसोबत अर्थव्यवहार करण्यात आले. मात्र आरडी आणि मुदतठेवीचे कालावधी संपल्यानंतरही ग्राहकांना रक्कम परतफेड करण्यात आली नाही. एवढेच नव्हेतर अभिकर्त्यांचे कमिशनही देण्यात आले नाही. या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक टाळाटाळ करीत असून या प्रकरणाची तक्रार पोलिस ठाण्यात केली असता नोंद करण्यासही टाळाटाळ होत आहे, असा आरोप अन्यायग्रस्त अभिकर्त्यांनी स्थानिक विर्शामगृहात १४ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रपरिषदेत केला.
यावेळी माहिती देताना ते म्हणाले, सन २000 पासून ही संस्था गोंदिया शहरात कार्यरत आहे. १५ अभिकर्त्यांच्या माध्यमातून संस्थेचा अर्थव्यवहार व्हायचा. मासिक बचत ठेव व मुदतठेव स्वीकारल्या जात असे. नोव्हेंबर २0१७ ते मार्च २0१८ पयर्ंत संस्थेकडून काही ग्राहकांना तुटक-तुटक परतफेड करण्यात आली. मात्र, त्यानंतर परतफेड करण्यास टाळाटाळची भूमिका घेण्यात आली. एंकदरीत जवळपास दीड कोटी रुपयांचे देणे संस्थेकडे येत आहे. परंतु, संस्थेकडून टाळाटाळ होत असल्यामुळे ग्राहकवर्ग अभिकर्त्यांना त्रास देत आहेत. तर अध्यक्ष सागर गोलानी व व्यवस्थापक मंजू रोचवानी या दोघांना परतफेड संदर्भात विचारणा केली असता, ते फक्त टाळाटाळीचे उत्तर देतात, एवढेच नव्हेतर पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात आले आहे. यासंदर्भात पोलिसांकडे दाद मागितली असता पोलिस विभाग दुय्यम निबंधक कार्यालयाकडे बोट दाखवून मोकळे होत आहे.
तर दुसरीकडे दुय्यम निबंधक कार्यालयही या संदर्भात पुढाकार घेण्यास टाळाटाळ करीत आहे, असा आरोप अभिकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारीपासून राज्य शासनाच्या पोर्टलपयर्ंत करण्यात आली आहे. पत्रपरिषेदला अभिकर्ता जाकीर हुसैन, विरेंद्र खटवानी, सोमेश्‍वर बागळकर, दिनेश थानथराटे, विश्‍वनाथ शेंडे, अतिश पवनकर, कल्पना वडपल्लीवार उपस्थित होते.