मुख्य बातम्या:

४ थे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन पवनीत

पवनी,दि.०२ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवनी येथे १६ डिसेंबरला सकाळी ९ वाजता संभाजी चुटे रंग मंदिर नगर परिषद मैदान येथे ४ थे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन संपन्न होत आहे..
नव्या पिढीतील युवकांना राष्ट्रसंती तुकडोजी महाराजांच्या साहित्यांचा, विचारांचा आणि कर्तृत्वांचा परिचय होऊन ग्रामोन्नती व्हावी व त्यातून सेवाभाववृत्ती जागृत व्हावी या प्रेरक हेतुने व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त ४ थ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलन व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे.मेळाव्याचे उद्घाटन आ. रामचंद्र अवसरे याच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी श्री गुरुदेव सेवा मंडळ मोझरीचे प्रचारक दा.श्री. पाटील राहणार आहेत. स्वागताध्यक्ष नगराध्यक्ष पूनम काटेखाये, सहस्वागताध्यक्ष न.प. उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर तर मार्गदर्शक म्हणून डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, शिवाजी शि. सं. अमरावतीचे सचिव शेषराव खाडे, डॉ. अरविंद देशमुख राहणार आहेत. प्रमुख अतिथी खासदार मधुकर कुकडे, माजी खासदार नाना पटोले, आ. चरण वाघमारे, नगराध्यक्ष सुनील मेंढे, आंनद जिभकाटे, ग्रामगीता प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक, नगरविकास आघाडी अध्यक्ष विलास काटखाये, विकास राऊत, मोहन पंचभाई, डॉ. योगेश रामटेके, मुकेश बावनकर, डॉ. विजय ठवकर, सुबोधदादा राहणार आहेत. ङ्क२१ व्या शतकातील युवकासमोरील आव्हाने व राष्ट्रसंतांचे विचारङ्क या विषयावर १६ डिसेंबरला दुपारी १२ वाजता डॉ. प्रदीप विटाळकर यांचे अध्यक्षतेखाली सुबोधदादा, प्रा. प्रशांत ठाकरे, प्रा. स्वप्नील इंगोले यांचे मार्गदर्शन, दुपारी २.३० वाजता डॉ. नंदाताई पांगूळ यांचे अध्यक्षतेखाली रेखाताई बुराडे, साक्षी पवार, गंगाताई काकडे यांचे मार्गदर्शन होणार आहे. तत्पूर्वी १५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी व ग्रामगीता शोभायात्रा निघणार आहे. तसेच १६ डिसेंबरला सामूदायिक ध्यान व चिंतन, ग्रंथ पूजन, भजन आदिंचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक वासूदेव रायपुरकर, अध्यक्ष शशिकांत भोगे, उपाध्यक्ष राम भोपे, सचिव विशाल बोरकर, सहासचिव प्रशांत ठाकरे, कोषाध्यक्ष भाष्कर फुंडे, सदस्य कमलाकर रायपुरकर, तुकाराम भाजीपाले, प्रकाश भोगे, सोमा कावळे, बापूराव सावरबांधे, सूर्यकांत वरवाडे, किशोर भोयर, प्रा. दिगंबर सहारे, माधुरी नखाते, कल्याणी जिभकाटे, अल्का शास्त्रकार, विणा भोगे, रंजना शहारे व सदस्यांनी केले आहे..
Share