मुख्य बातम्या:
कन्हैयाकुमार, प्रकाश राज रविवारी नागपुरात# #शुक्रवारपासून गडचिरोलीत कृषी व गोंडवन महोत्सव# #अकोल्यात जीर्ण इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू# #अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गुरुवारला# #नक्षल्यांनी पेरून ठेवलेले विस्फोटक पोलिसांनी केले जप्त# #"प्रविण कोचे उत्कृष्ठ पोलीस पाटील पुरस्काराने सम्मानीत"# #अवैध रेतीवाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक# #परिवर्तन स्पेशल स्कूल (पीओ आरडीएसी)  सफदरजंग एन्क्लेव में बच्चों की स्पर्धा# #अपघाताला आळा घालण्यासाठी अतिक्रमणे हटविण्यासोबतच नियमांची अंमलबजावणी करा- लक्ष्मीनारायण मिश्रा# #रविवारी निरीक्षक प्रमाणित शाळा व तत्सम पदे परीक्षा

गडचिरोली जिल्हयात पुन्हा नक्षल्यांनी ट्रक जाळला

गडचिरोली,दि.03ः-तालुक्यातील सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरातील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय हेडरी पासून 300 मीटर अंतरावर व विनोबा आश्रम शाळेजवळ ठेवलेल्या लोहखनीज उत्खनन कामावरील ट्रकला (दि. 03) पहाटे दोन वाजता दरम्यान नक्षल्यांनी पेटवून दिले.सुरजागड लोहखनिज पहाड़ी पासून एक किलोमीटर अंतरावरील हेडरी या गावात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, तथा पोलिस स्टेशन व केंद्रीय राखीव पोलिस दल, अशा हजारो शस्त्रसज्य पोलिसांची रात्र दिवस सुरक्षा तैनाती, काही ड्रोन कैमऱ्यांची करड़ी नजर, अनेक पोलिस खबरे कार्यरत आहेत.

अशा वेळी, नक्षल्यांचा पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी स्थापना दिन सप्ताह दरम्यान हैदोश सुरु असताना पोलिस मात्र बेसावध असल्याने ट्रक जाळला गेल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. त्यामुळे नक्षल्यांकडून मोठी घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही.तालुक्यात नक्षल्यांनी दिनांक 30 नोव्हेंबरला गट्टेपल्ली गांव जंगल परिसरात पंतप्रधान ग्राम सड़क निर्माण कार्यावरिल दहा जेसीबी मशीनसह सोळा वाहने पेटवून दिल्यानंतर नक्षल्यांचा पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा 18 वा स्थापन दिवस 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान साजरा करण्याचे आवाहन करणारे व आत्मसमर्पित नक्षल कमांडो पहाड़सिंग विरुद्ध मजकूर छापलेली पोष्टर व ब्यानर सर्वत्र टाकल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून खासगी वाहतूकदारांनी दुर्गम भागातील गट्टा, कसनसुर व जारावंडी मार्गची वाहतूक बंद ठेवली आहे. नक्षल्यांकडून गेल्या चार दिवसांपासून सतत होत असलेल्या हिंसक करवाया व पत्रकबाजीमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

तर दुसरीकडे सप्ताहाच्या नावाखाली दहशत निर्माण करू नका. नक्षल सप्ताह पाळायला भाग पाडाल तर याद राखा. आम्ही तुमचे गुलाम नाही. नक्षल सप्ताहाच्या नावाखाली आमच्यावर अन्याय करणे थांबवा, असे खुले आव्हान पुलखल, पेंढरी, तारगुडा, जयसिंगटोला, येरकड या नक्षलग्रस्त भागातील गावकºयांनी नक्षलवाद्यांना दिले आहे.नक्षलवाद्यांमुळे दुर्गम भागाचा विकास रखडला असल्याची बाब आता तेथील निरक्षर नागरिकांच्याही लक्षात आली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा विरोध करण्यास नागरिकांनी सुरूवात केली आहे. पुलखल, पेंढरी, तारगुडा, जयसिंगटोला, येरकड ही गावे नक्षलग्रस्त आहेत. येथील नागरिक नक्षल्यांच्या दहशतीमुळे त्रस्त झाले आहेत. २ डिसेंबरपासून पीएलएजीए सप्ताहानिमित्त बंद पाळण्याचे आवाहन नक्षल्यांनी केले होते. मात्र गावकºयांनी नक्षल्यांच्या बदंचा विरोध करून नक्षल्यांनाच आव्हान दिले.

Share