मुख्य बातम्या:
लमाणतांडा येथे जय सेवालाल महाराज जयंती साजरी# #पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर

चित्रपट हे समाजप्रबोधनाचे साधन व्हावे-अनिल सवई

गोंदिया,दि.०४-हिराज प्राडक्शनच्यावतीने जागतिक दिव्यांगदिनी गोंदियासह पुर्व विदर्भातील जिल्ह्यात चित्रिकरण झालेल्या आणि दिव्यांगाच्या जिवनावर आधारित असलेल्या दिव्यांग चित्रपटाच्या पोस्टरचे लोकार्पण भवभूती रंगमंदीराच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात उत्साहात करण्यात आले.यावेळी उदघाटक म्हणून बोलतांना जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई यांनी चित्रपट हे मनोरंजनाचे साधन न होता प्रबोधनाचे माध्यम होणे आवश्यक असून दिव्यांग चित्रपटाची संकल्पना आणि कथानकाकडे बघितल्यास समाजाला मार्गदर्शन करणारा हा चित्रपट असून पुर्व विदर्भातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे दर्शन या चित्रपटाच्या माध्यमातून होणार असल्याचे विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार प्रा.एच.एच.पारधी,खेमेंद्र कटरे,अमर वराडे,अतुल सतदेवे,डॉ.नोव्हील ब्राम्हणकर,डॉ.मौसमी ब्राम्हणकर,गुरमीत चावला,सुर्वणा हुबेकर,सविता बेदरकर,आरती चवारे,जितेश राणे,दिपक बहेकार,शिव नागपूरे,विश्वजित बागडे,कैलास भेलावे,सुनिल भोंगाडे,रवि भांडारकर,योगेश राऊत,बदर शेख,जिवनलाल शरणागत,राकेश टेंभरे,चित्रपटाचे निर्माता दिनेश फरकुंडे,दिग्दर्शक दिलीप कोसरे,विकास गजभिये,आकाश चंद्रगिरीवार,याशिन मेमन,पारस रजक,शैलेष दानी,संतोषकुार,पोरस शेंडे यांच्यासह चित्रपटाचे कलावंत उपस्थित होते.याप्रसंगी पाहुण्याच्या हस्ते दिव्यांग चित्रपटाच्या पोस्टरचे लोकार्पण करण्यात आले.
पुढे बोलतांना सवई म्हणाले की,आधीच्या काळातील चित्रपटामध्ये एक समाज घडविण्याचा संदेश असायचा आपल्या युवकांनी सैराट सारख्या चित्रपटाला डोक्यावर घेतले असले तरी त्या चित्रपटातून समाजाला काय मिळाले याचाही विचार महत्वाच आहे.चित्रपट म्हटले की मनोरंजन हा भाग आज झालेला असली तरी समाजप्रबोधनाशिवाय ते पुर्ण होऊ शकत नाही,त्यामुळे दिव्यांग या चित्रपटाच्या माध्यमातून अंपगाचे जिवनमान समाजात कसे असते त्याचे चित्रन समाजापुढे दाखविण्याचा झालेला प्रयत्न उल्लेखनिय असून यापुढेही असेच चित्रपट काढून समाजपयोगी कार्य करावे अशा शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रा.एच.एच.पारधी,अमर वराडे,खेमेंद्र कटरे आदीनीही आपले विचार व्यक्त केले.दिग्दर्शक दिलीप कोसरे यांनी चित्रपटाबद्दल व कलावंताची माहिती दिली.संचालन शिव नागपूरे यांनी केले

Share