विद्यार्थी नेणार्या टाटा सुमोचा अपघात १ विद्यार्थीनी ठार ८ जखमी

0
21

गोंदिया,दि.०4ः- गोंदिया तिरोडा राज्यमार्गावरील गंगाझरी पोलीस ठाणोंतर्गत एमआयडीसी मुंडीपार येथे आज मंगळवारला सकाळी 9.30 च्या सुमारास झालेल्या अपघातात १ विद्यार्थिनी ठार तर ८ जखमी झाल्याची घटना घडली.मृत विद्यार्थीनीचे नाव नेयत्री सचिन मेंढे(वय 4,रा.मुंडीपार)असे आहे. हे सर्व विद्यार्थी भानपूर येथील ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल’ कान्व्हेटंचे विद्यार्थी आहेत.हा अपघात टाटा सुमोचालकाचे(एमएच 35,एम.127)  वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सुमो झाडाला आढळली आणि वाहनाने 4 पलट्या मारल्या.सदर वाहन सुभाष कामेश्वर बोपचे यांचे नावे असून त्याच्याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाचा स्कुलबसकरीता लागणारा परवाना नाही. जखमी विद्याथ्र्यामध्ये आचल रविंद्र पाठक,राजीव रविंद्र पाठक,हिमांशू चंदन दमाहे (रा.एमआयडीसी मुंडीपार),दक्ष भोजराज पटले,प्रणव नरेश बिसेन,अमन अंकुश बर्वै,प्रणाली नरेश बिसेन(रा.सेजगाव) यांचा समावेश आहे. जखमी विद्यार्थ्यांना केटीएस रुग्णालयात हलविण्यात आले आहे.नेयत्री ही वाहनचालकाच्या शेजारील सीटवर बसलेली होती,अपघाताच्यावेळी तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर वाहनचालक दखने याने घटनास्थळावरुन पळ काढला.अपघातातील 2 विद्यार्थी अजूनही गंगाबाई रुग्णालयात उपचार घेत आहेत.तर नेयत्रीची उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह कुटुबियांना सोपविण्यात आले.या घटनेने मुंडीपार गावामध्ये शोककळा पसरली असून शिक्षणसंस्थाचालकावर गुन्हा नोंदविण्याची मागणी होत आहे.

या अपघातामुळे गावखेड्यात ज्या खासगी कान्व्हेंट सुरु झालेल्या आहेत आणि इतर गावातून वाहनाद्वारे विद्यार्थ्यांची ने आण केली जाते यावर आता मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.या अपघातातील टाटा सुमोचालकासह कान्व्हेंटचा संचालक व मुख्याध्यापकाच्या दुर्लक्षतेमुळे विद्यार्थी वाहून नेणार्या वाहनांच्या परवानगीसोबतच सुरक्षीततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.सोबतच शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी हे गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा असताना खासगी शाळांना परवानगी देतातच कसे हा सुध्दा प्रश्न आहे.वाहनचालकाच्या दुर्लक्षितपणा व मुख्याध्यापकाचा निष्काळजीपणामुळे मेंढे कुटुंबियांना 4 वर्षाच्या मुलीला गमवावे लागले आहे.तेवढाच दोष अवैध वाहनातून आपल्या पाल्यांना शाळा,कान्व्हेंटमध्ये पाठविणार्या पालकांचा आहे.या अपघातातनंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सदर वाहनमालकावर कारवाई प्रस्तावित केली असून मुख्याध्यापकावरही कारवाई करण्यासंबधी पोलीसांना कळविले आहे.सोबतच परिवहन विभागाच्या भरारी पथकाला घटनास्थळाचा पंचनामा करुन वाहनचालक व मालकाविरुध्द कारवाईच निर्देश दिले आहेत.