मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

ट्रकच्या धडकेत ट्रक्टरचालकासह २ ठार,५ जखमी

गोंदिया,दि.०६- जिल्ह्यातून जाणाèया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील देवरी तालुक्यातील भर्रेगावफाट्याजवळ बुधवार रात्रीला झालेल्या अपघातात ट्रक्टरचालकासह २ जागीच ठार तर ५ जण जखमी झाल्याची घटना घडली.सिरपूरबांधकडे येणाèया टड्ढॅक्टरला पाठीमागून वेगाने येणाèया टड्ढकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.मृतामध्ये टड्ढॅक्टर चालक मोरेश्वर हनू येल्ले (वय ४४) व सोमेश्वर माणिक उके (वय ५५) यांचा समावेश आहे.अपघातातील जखमींवर देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींमध्ये देवरी तालुक्यातील आमगाव आदर्श निवासी नरेश जोशी (वय २३), अमृत येल्ले (वय २२),महेश उके (वय २५), हेमराज येले(वय२५) व ज्ञानेश्वर येल्ले (वय २४) यांचा समावेश आहे.
आमगाव आदर्शवरुन मध्यरात्रीच्या सुमारास टड्ढॅक्टरने (क्र. एम.एच. ३५ ए. ८९३२) धान चुराईची मशीन घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरून सिरपूरबांधकडे जात असताना अचानक पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टड्ढक (क्र. एम.एच. २३ एयू. ४००५)च्या चालकाने टड्ढॅक्टरला जोरदार धडक दिली.या धडकेत टड्ढॅक्टर धान चुराई मशीनसह रस्त्याच्या कडेला पलटले.त्यावेळी टड्ढॅक्टरमध्ये ७ लोक बसलेले होते.त्यापैकी चालकासह २ जण जागीच ठार, तर इतर ५ जण जखमी झाले आहेत.

Share