कुठ गेल्या चळवळी आणि आमचे लोक….,सारे पोट भरती बिल्ली व बोक…

0
21

👉 वैचारिक कवितांनी रंगले कविसंमेलन
👉 विदर्भ समाज गौरव पुरस्कार सोहळा

गोदिंया,दि.09: कुठ गेल्या चळवळी  आणि आमचे लोक… सारे पोट भरती  बिल्ली आणि बोक… मुन्नाभाई नंदागवळी यांच्या कवितेने कविसंमेलनाला वैचारिक रंग चढवला. आणि हे कविसंमेलन जबरदस्त रंगले.

विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटना गोदिंया जिल्हा यांच्यावतीने येथील भवभूती रंगमंदिरात सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते यांच्या सत्कार व कविसंमेलनाचे आयोजन आज रविवारला(दि.09) करण्यात आले होते. यावेळी कविसंमेलनाला प्रसिद्ध कवि प्रा. युवराज गंगाराम, मानिक गेडाम, मनोज बोरकर, मुन्नाभाई नंदागवळी, के ए रंगारी, केवलराम उके, मिलिंद रंगारी, शिक्षक अंबादे, निखिलेस यादव, छगन पंचे, वाय पी मेश्राम, शशि तिवारी, सुरेंद्र जगने, चैतन्य मातुरकर, आदी महत्वाचे कवि मंचावर उपस्थित होते.याप्रसंगी सर्व कविंचे सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. राजकारणी, पाऊस, प्रेम, विरह, शेतशिवार अशा संदर्भित कविता कविंनी सादर केल्या. यावेळेला डॉ. नुरजहा पठाण यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक मिलिंद मेश्राम यांनी करुन संचालन रमेश शर्मा यांनी केले.