०३ फेब्रुवारीला तिरोडा येथे पहिले अखिल भारतीय पोवारी साहित्य संमेलन

0
18
गोंदिया,दि.१०ः-राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा प्रणित, ‘राष्ट्रीय पवारी साहित्य, कला, संस्कृती मंडल व तिरोडा पोवार समाज संघटनेच्या सयूंक्त विद्यमाने येत्या ०३ फेब्रुवारी २०१९ रोजी (रविवार)  तिरोडा येथे पहिले अखिल भारतीय पोवारी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तिरोडा येथे आयोजित सभेत राष्ट्रीय पवारी साहित्य, कला, संस्कृती मंडळाच्या कोअर कमिटी सभेत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टेंभरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष लखनसिंग कटरे (ज्येष्ठ साहित्यिक)  यांचे मार्गदर्शनात पार पडली.त्यात सर्वानुमते तिरोडा येथे ०३ फेब्रुवारीला तिरोडा  तालुक्यातील गणेश हायस्कुल गुमाधावडा येथे पहिले अखिल भारतीय पोवारी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले.पोवार/पवार समाजाचे हे पहिलेच साहित्य संमेलन असून सदर संमेलनामध्ये पोवार/पवार/भोयर पवार साहित्यिक, कवी, गीतकार, कलाकार, कीर्तनकार, लेखक, गायक यांनी आपले आपले साहित्य शारळश्र;-वर्शींशपवीरलहर्रीवहरीळ३१ऽसारळश्र.लो यावर पाठवावे तसेच संपर्क साठी व्हाट्सअप्प-९२८४०२८७१४ , ९९२३१४१२६३ (राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय पवारी साहित्य, कला, संस्कृती मंडल‘) यांचे भ्रमणध्वनीवर संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पवार साहित्यिक, कवी, गीतकार, कलाकार, कीर्तनकार, लेखक, गायक यांनी आपले साहित्य ३१ डिसेंम्बर २०१८ पर्यंत स्मरणिकेसाठी पाठवावे तसेच साहित्य संमेलनासाठी नावाची नोंदणी करावे,असे आव्हान ‘राष्ट्रीय पवारी साहित्य, कला, संस्कृती मंडल‘ चे राष्ट्रीय सचिव देवेंद्र चौधरी यांनी केले आहे.