सर्व राजकीय पक्षांनी बी.एल.ए. ची नियुक्त करावी: डॉ. सजीव कुमार

0
21

विभागीय आयुक्तांनी घेतली सर्व राजकीय पक्षांची समन्वय बैठक
गोंदिया, दि. 13 : : : आगामी लोकसभा/विधानसभा निवडणूक सुलभरीत्या पार पाडण्यासाठी विभागीय आयुक्त  डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विविध पक्षांची समन्वय बैठक आज दि. 13 डिसेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पाडण्यात आली असून सदर बैठकीत अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत सर्व राजकीय पक्षांना बुथ निहाय बी.एल.ए. नियुक्त करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले. तसेच बी.एल.ओ. यांची यादी तहसिलदार, उपविभागीय अधिकारी तसेच निवडणूक विभागात सादर करण्याचे सांगीतले.  निवडणूक विभागतर्फे  बी.एल.ओ. यांच्याशी समन्वय साधून निवडणूक प्रकियेत येणाऱ्या अडी-अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देण्याकरीता चर्चा करण्यात आली. मतदार यादीत नाव शुद्धीकरण करणे, नाव जोडणे, नाव कमीकरणे, फोटो जोडणे, मैय्यतांचे नाव कमी करणे, नाव स्थानांतरण करणे इत्यादी कामांसाठी समन्वयक म्हणून बुथ निहाय बी.एल.ए. ची नियुक्ती गरजेची असल्याचे विभागीय आयुक्त यांनी सांगितले.
या वेळेस जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी राजकीय पक्षांशी चर्चा करतांना सांगितले की मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जात असून बी.एल.ए. आणी बी.एल.ओ. यांच्या मार्फत मतदारांच्या अडचणी व त्यांचे समाधान करता येईल. आगामी होणाऱ्या निवडणूक सुलभ रीत्याने पार पाडण्यास राजकीय पक्षांचे सहभाग महत्वाचे असल्याने त्यांनी सांगितले.           सदर बैठकीत प्रामुख्याने उपायुक्त सुधाकर तेलंग (महसुल), अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, सुनिल कोरडे प्रभारी निवडणूक उपजिल्हाधिकारी, हरीशचंद्र मडावी निवडणूक नायाब तहसिलदार, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.