उत्तर महाराष्ट्रातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र चांदवडला वाटप

0
10

चांदवड,दि.13ः- बहुप्रतिक्षित मराठा आरक्षण अखेर झाले असून आगामी काळात निघणाऱ्या शासकीय सेवेतील पदांसाठी ते लागू करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर मराठा जात प्रमाणपत्राचे वाटप महसुल विभागाकडून सूरु करण्यात आले असून उत्तर महाराष्ट्रातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.आगामी काळात महाराष्ट्र शासन ७२ हजार शासकीय पद भरण्याच्या तयारीत असून यातील पहिल्या टप्यातील ३६ हजार पदे भरण्यात येणार आहे. यासाठी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू करण्यात आल्याने आगामी काळात मराठा तरुणांची धावपळ होणार आहे याच पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या मार्फत दहा मराठा तरुणांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.दरम्यान राज्यातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र मराठवाड्यातुन वितरित केले आहे यानंतर उत्तर महाराष्ट्रातुन पहिले मराठा जात प्रमाणपत्र हे चांदवड प्रांत कार्यालया अंतर्गत वाटप करण्यात आले आहे.यामुळे प्रमाणपत्र लाभार्थी विद्यार्थ्यांनी शासनासोबत चांदवड उपविभागीय कार्यालयाचे आभार मानले.

यावेळी उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, नायब तहसीलदार एस. पी. भादेकर, नायब तहसिलदार मीनाक्षी गोसावी, डी. यु. राखूडे, ए. डी. मेदडे, जे. एम. गायकवाड, एम. के. नाईक, गोराने, संदीप गांगुर्डे यांच्यासह मराठा जात प्रमाणपत्र लाभार्थी सुवर्णा शेळके, कृष्णा गांगुर्डे, योगेश शिंदे, गणेश पवार, तृप्ती शेळके, अजय शेळके, सुमित शेळके, नितीन ठाकरे, प्रियंका शिंदे, बापू ठाकरे, मनोहर चव्हाण, कैलास चव्हाण, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.