ब्लॉसम स्कुल मध्ये “गुड टच बॅड टच” विषयावर कार्यशाळा

0
14

देवरी:दि.14ः-तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या संकल्पनेतून “गुड टच बॅड टच” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून प्राध्यापिका सुनंदा भुरे , संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल , प्राचार्य डॉ सुजित टेटे मंचावर उपस्थित होते .
शालेय जीवनात विध्यार्थ्यांना गुड टच बॅड टच या विषयाची जाणीव असावी आणि घडणाऱ्या अनावश्यक घटनेला आळा बसावा या उद्धेशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सुंदर फुलपाखरांचे उदाहरण देऊन चिमुकल्या विध्यार्थ्यांना ही संकल्पना मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सुनंदा भुरे यांनी समजावून सांगितली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मोहुर्ले यांनी केले.आभार प्रदर्शन निर्मल अग्रवाल यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केला.