अपयशाने न खचता प्रामाणिक प्रयत्न करावे-गणेश टेंगले

0
22

सांगली/जत(राजेभक्षर जमादार),दि.१७ः– जीवनात अपयश आले म्हणून आपण खचून जाऊ नये प्रामाणिक प्रयत्न करावे.ध्येय मोठे ठेवल्यास ध्येयापर्यंत पोहचता येते असे मत आयएएस अधिकारी गणेश टेंगले यांनी व्यक्त केले आहे. बाबरवस्ती पांडोझरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत आयएएस झाल्याबद्दल आयोजित सत्कार सभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते . स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी केले.  शाळा व्यवस्थापन  समितीच्या वत्तीने सत्कार करण्यात आला.ते पूढे म्हणाले, जिद्दीने अभ्यास केला एक ध्येय ठेवून तीन वर्षे मेहनत केली.  जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण झाले.आज कितीही वेगवेगळ्या शाळा निघाल्या तरी मोफत व गुणवत्ता पूर्ण  शिक्षण जर गोरगरिबाच्या मुलांना मिळायचे असेल तर सरकारी शाळा हाय एकमेव उपाय आहे.

जत सारख्या दुष्काळी भागातून आल्याने आजूबाजूची परिस्थिती माहीती होती. त्याचा फायदा झाला.घरची परिस्थिती बरी होती वडील ऊस तोडणी मुकादम आहे. आई,भाऊ, कुंटुबाचे प्रोत्साहन मिळाले असल्याचे मिळाले.कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा  सविता मोटे, केरुबा गडदे,नेताजी टेंगले,रियाज जमादार,मुख्याध्यापक दिलीप वाघमारे, पालक व विद्यार्थी  उपस्थित होते.