शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, कमलनाथ यांचा पहिल्याच दिवशी निर्णय

0
17

भोपाळ,दि.17 : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याबाबत घोषणा केली आहे. शेतकऱ्यांची कोणत्याही नियम आणि अटींशिवाय सरसकट कर्जमाफी करण्यात आली आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारात मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. निवडणूक विजयानंतर राहुल यांनी कर्जमाफीवर केलेल्या विधानावरून विरोधकांकडून त्यांना टार्गेट करण्यात आले होते. पण अखेर काँग्रेसने कर्जमाफी करून विरोधकांना उत्तर दिले आहे.यामुळे भाजपच्या आंंधळ्या महाराष्ट्रासह देशभरातील भक्तांची पुर्णत नामुस्की झाली.महाराष्ट्र सरकार अद्यापही कर्जमाफी पुर्णपणे करु शकलेली नाही.

राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेताच त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील फाईलवर स्वाक्षरी केली. सत्तेवर आल्यास 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन काँग्रेसकडून देण्यात आले होते. कमलनाथ यांच्या शपथविधी समारंभानंतर अवघ्या तासाभरात काँग्रेसने या आश्वासनाची पूर्तता केली आहे.
आज दुपारी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जांबुरी मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग उपस्थित होते. कमलनाथ काँग्रेसचे 18वे मुख्यमंत्री आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर अवघ्या तासाभरात कमलनाथ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला.