‘एमएलए कप’ प्रौढ कबड्डीचा थरार

0
13

गोंदिया दि. १७ :: ग्रामीण भागातील तरूण आणि विद्यार्थ्यांमध्ये देशी मैदानी खेळांची आवड निर्माण होऊन त्यांना व्यासपीठ निर्माण व्हावे ही इच्छा आहे. मात्र आता हे व्यापपीठ आता लुप्तप्राय होत आहे. खेळाडूंना ही संधी पुन्हा त्यांना प्राप्त करून देण्याच्या हेतूने आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आमदार चषक प्रौढ कबड्डी स्पर्धेचे आयोजन १७ ते २५ डिसेंबरपर्यंत करण्यात आले आहे. या स्पर्धा नागरा, रतनारा, फुलचूर, सतोना, काटी, पांढराबोढी, खातिया, शिरपूर, ईर्री,नवेगाव, दांडेगाव, कटंगीकला आणि खमारी होणार आहेत. या स्पर्धांचे उद्घाटन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान सकाळी १०.३० वाजता होणाऱ्या उद्घाटनाला कॉंग्रेसचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. .

स्पर्धेचे आयोजन दोन टप्प्यामध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद स्तर आणि त्यात विजेता ठरलेल्या संघांचा २५ डिसेंबर रोजी कामठा येथील क्रिडा संकुलात अंतिम सामना होणार आहे. जिल्हा परिषद विजेत्या झोनस्तरीय संघाला ७ हजार रूपये आणि उपविजेत्या संघाला ५ हजार रूपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तालुकास्तरीय प्रथम संघास ३१ हजार व उपविजेत्याला संघाला २१ हजार रूपयाचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा २१ ते ४५ वयोगटाकरीता असणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे..