प्रश्नमंजुषा स्पर्धेत जालिहाळ बुद्रुक हायस्कूलचा प्रथम क्रमांक

0
18

संख(सांगली)दि.१७ ::जालिहाळ बुद्रूक (ता.जत ) येथील स्कुल ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन जालिहाळ बु. येथील विद्यार्थी तालूकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत मुले व मुलींनी प्रथम क्रमांक पटकावत यश मिळविले आहे.तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत जत तालुक्यातील अतिशय दुर्गम आणि शेवटच्या टोकाला असलेल्या जालिहाळ बुद्रुक येथील हायस्कूलच्या विध्यार्थ्यानी प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी यशस्वी विध्यार्थ्याना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दि. 14 व 15 डिसेंबर 2018 रोजी श्री हनुमान न्यु इंग्लिश स्कूल, वळसंग ता. जत येथे 44 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. यातील प्रश्नमंजुषा कार्यक्रमात स्कूल ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन जालिहाळ बु. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकविला.तालुक्यातील एकूण 31 शाळांच्या विद्यार्थी गटांनी सहभाग घेतला होता. शाळेच्या सोमनाथ किट्टद , कु.शशिकला मुचंडी व कु. अविना कांबळे या विद्यार्थ्यानी हे यश खेचुन आणले. या यशस्वी विधर्थ्यांना शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील,अजिंक्यतारा विध्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड प्रभाकर जाधव, गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब जगधने यांच्याहस्ते व चंद्रकांत गुडोडगी,विद्याधर किटड, आर.डी.शिंदे यांच्या उपस्थितीत सहभागी व विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले.

ही शाळा अत्यंत दुर्गम व दुष्काळग्रस्त भागात कार्यरत असून शाळेतील अत्याधुनिक सुविधा, डिजीटल प्रणाली , वैज्ञानिक खेळणी असलेले क्युरिओसिटी सेंटर , रेडिओ सेंटर व त्यावरील शैक्षणिक कार्यक्रम तसेच विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती यामुळेच विद्यार्थ्यांना यश मिळाले असे मुख्याध्यापक डी.डी. जाधव यांनी सांगितले. विज्ञान शिक्षक सावंत एस.एस. तसेच मुंडे ए.व्ही., कु.कांबळे एस.डी. व पवार ए.एफ. यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे सचिव एन.व्ही. देशपांडे सर , सर्व पदाधिकारी , मुख्याध्यापक डी.डी. जाधव,तसेच जालिहाळ बु. हे अतीश दुर्गम भागातील शाळा ही एका कोपऱ्यात असलेले स्कुलऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन जालिहाळ बु. चे नाव उंचावर नेत असल्यामुळे शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचे नाव गावामध्ये व तालुक्यात  कौतुक होत आहे .