भारतीय शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण डिजिटल सिंचनप्रणाली

0
11

गोंदिया,दि.18 : भारतीय शेतकऱ्यांना विविध पिकांची, हवामानाची माहिती उपलब्‍ध व्‍हावी यासाठी ‘नेटबीट’ तंत्रज्ञान बनवण्यात आल्‍याची माहिती नेटाफीमचे व्यवस्थापकीय संचालक रणधीर चौहान यांनी शेतक-यांसाठी घेण्‍यात आलेल्‍या एका कार्यक्रमात सांगितले. नेटबीट हे जगातील पहिले आणि सर्वात अत्याधुनिक डिजिटल सिंचन प्रणाली असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी नमूद केले. शेतजमिन आणि बाहेरील पिके, माती, हवामानाची स्थिती यांच्याशी संबंधित डेटावर सद्य स्थितीला साजेशा असलेल्या शिफारशी देण्याचे काम नेटबीटद्वारे केले जाते. तसेच कोणत्याही वेळेला आणि कुठलाही हवामान अंदाज, इतर सुविधा आणि शेतीचा दूरवरच्या ढगांशी असणारा संबंध यामुळे समजतो.
याद्वारे शेतकऱ्यांना शेतीकडे लक्ष देणे, तपासणी करणे आणि सिंचनाचे काम सोपे व्हावे यासाठी ही सिंचन प्रणाली प्रामुख्याने बनवण्यात आली आहे.
नेटबीटमुळे शेतकऱ्याला विविध पिकांच्या नमुन्यांचा डेटा मिळू शकतो, त्यामुळे पाण्याचा आणि इतर स्त्रोतांचा कमीत कमी वापर करुन ही सिंचन प्रणाली शेतकऱ्याला स्वत:ला वापरता येणार आहे.
“सध्याची अन्न व पाणी यांच्या सुरक्षेची आव्हाने पाहता मौल्यवान संसाधनांची कमतरता, पाण्याचा अकार्यक्षम वापर यामुळे ही प्रणाली एक वरदान ठरणार असल्‍याचे इझहर गिलाड म्हणाले.याबाबत बोलताना रणधीर चौहान म्हणाले, “नेटफीम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी स्त्रोतांचा वापर करुन जास्त पिक उत्पादन करण्यासाठी जगभरात मदत करते. नेटबीटद्वारे लहान आणि मोठ्या शेतकऱ्यांना डिजिटल सिंचन आणि कमीत कमी स्त्रोतांमध्ये जास्त उत्पन्न देण्यासाठी टिकाऊ आणि नाविन्यपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम केले जाते.” यावेळी रणधीर चौहान, लायोर डोरोन, इझर गिलाड उपस्थित होते.