२१ डिसेंबरला गोरेगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा

0
13

गोंदिया दि.१८.: महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त वतीने गोरेगाव तालुक्यातील माविमच्या बचतगटातील महिलांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन २१ डिसेंबर २०१८ रोजी पंचायत समिती प्रांगण गोरेगाव येथे दुपारी १२ वाजता करण्यात आले आहे.
मेळाव्याचे उदघाटन पालकमंत्री राजकुमार बडोले हे करतील. अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले हे असतील. विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, प्रमुख उपस्थितीत गोरेगाव नगराध्यक्ष आशिष बारेवार, जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, पं.स.सभापती माधुरी टेंभरे, उपसभापती लिना बोपचे, जि.प.सदस्य सर्वश्री ज्योती वालदे, रोहिणी वरखडे, परसराम कटरे, ललिता चौरागडे, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून अग्रणी जिल्हा प्रबंधक दिलीप सिल्लारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, तहसिलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी रोहिणी बनकर, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी व्यवस्थापक बी.एम.शिवणकर, आर्थिक साक्षरता गोंदियाचे केंद्र प्रमुख आर.के.पहिरे, हिवरा येथील कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक एन.एस.देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती सदस्य सर्वश्री धनंजय वैद्य, अमृत इंगळे, खेमराज देशमुख, नंदकिशोर साखरे यांची उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्यात बँकेमार्फत मुद्रा लोन वाटप, इंटरनेट साथींना प्रिंटर वाटप, बचतगटांना बँकेमार्फत कर्ज वितरण, बचतगट उत्पादित वस्तुंची प्रदर्शनी, उद्योग वाढीसाठी तज्ञांचे मार्गदर्शन, फुलवात बनविण्याच्या मशिनचे प्रात्यक्षिक, कृषि विज्ञान केंद्र हिवरा मार्फत माती परीक्षण माहिती, महिलांना तसेच युवक-युवतींना मुद्रा योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी गोरेगाव तालुक्यातील बचतगटांच्या महिलांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे व तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र गोरेगावच्या अध्यक्ष नलिनी डोंगरे यांनी केले आहे.