परिविक्षाधीन पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

0
11

मुंबई, दि. 20 : भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली.यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रशिक्षण केंद्राचे अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना उपस्थित होते.सर्व परिविक्षाधीन पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शासक म्हणून नव्हे तर सेवक बनून काम करा. जनतेशी बांधिलकी ठेवून काम करा. जनतेच्या आशा-आकांक्षा, अपेक्षा जाणून घेऊन सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करा.
सर्व पोलीस अधिकारी अभियंता क्षेत्रातील आहेत, पोलीस क्षेत्रातही नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तपासाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करण्याचा सल्लाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिला.