हल्ली इतिहास रामभाऊ म्हाळगीत लिहिला जातो-आ.कपिल पाटील

0
15

गोंदिया,दि.२३ः- शालेय पाठ्यक्रमातून सध्या चुकीचा इतिहास अभ्यासक्रम शिकविला जात आहे.हा इतिहास बालभारतीत नव्हे, तर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत बसून लिहिला जातो, असा थेट आरोप लोकभारतीचे नेते आमदार कपिल पाटील यांनी आज केला.ते नमाद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य परिषदेच्या उद्घाटनानंतर बोलत होते. यावेळी पाटील यांनी भाजप सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर जोरदार हल्ला चढवला. ङ्कसरकारने विद्यापीठांचे स्वायत्त अस्तित्त्व संपवून टाकले आहे. स्वपक्षाच्या ९९ टक्के व्यक्ती अभ्यासमंडळांवर नेमून शिक्षण क्षेत्राचे वाटोळे करण्याचे काम राज्य व केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्र सरकारने इतिहास बदलला.साहित्य बदलले आहे.शिक्षणक्षेत्रात सर्व चुकीचे पायंडे पाडले जात आहेत,ङ्क असे पाटील म्हणाले. ङ्कशिक्षकांमध्ये पुरोगामी विचार रुजवण्याचा या अधिवेशनाचा उद्देश आहे. संविधानाचा मान राखून आपल्याला शिक्षणक्षेत्राचे रक्षण करण्याचे काम करायचे आहे,ङ्क असे आवाहन त्यांनी केले.
८ वे राज्यव्यापी शिक्षक साहित्य परिषदेचे उदघाटन खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते घंटानाद करुन करण्यात आले.यावेळी विचारमंचावर विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार,समेलनाध्यक्ष प्रा.वामन केंद्रे,आमदार कपिल पाटील अतूल देशंमुख राजेंद्र जैन अनिल देशमुख,प्रभाताई गणोरकर,निरजा,राजेंद्र झाडे, नवनाथ गेंड,अरुण म्हात्रे,जयवंत पाटील आदी उपस्थित होते.पाहुण्यांचे स्वागतगिताने स्वागत करून राष्ट्रगीताने सुरवात करण्यात आली.
प्रास्तविकात कवियत्री निरजा म्हणाल्या की पटेलामुळे मुंबई ते गोंदिया प्रवास झाला. पवाराच्या हस्ते १९९८ ला मी पहिला काव्यपुरस्कार स्विकारला कर्मकांड व चुकीच्या परपंरा म्हणजे संस्कृती नव्हे विचाराची प्रबोधनात्मक क्रांती व्हावी यासाठी फातिमा व सावित्रीबाईचा विचारांचा आदर्श घेऊन शिक्षक भारती काम करत आहे.शिक्षक कर्मकांडाला स़स्कृती मानतात परंतु येथे आलेले शिक्षक हे पुरोगामी विचाराचे असून पिढी घडविण्याचे काम करीत असल्याची माहिती दिली.