आई मुलाला सृष्टी देते,पण शिक्षक दृष्टी देतो-प्रा.वामन केंद्रे

0
32

गोंदिया,(खेमेंद्र कटरे) दि.२३ः-शिक्षक हा समाजरचनेतील महत्वाचा घटकच नव्हे तर तो विद्यार्थीरुपी सजग नागरिक घडविणारा कारागिर आहे.अणुबाम्बची शक्ती ही सर्वात मोठी नसून शिक्षण व संस्कृतीच सर्वात मोठे शस्त्र आहे.त्यामुळे शिक्षक हा चिंतनशिल आणि अभ्यासू असणेही तेवढाच महत्वाचा असून बदलत्या काळानुरुप शिक्षण देत असताना वास्तविक आणि पुरोगामी इतिहासाचा अभ्यास असणे आवश्यक आहे.आई जरी मुलाला जन्म देऊन सृष्टीत आणण्याचे कार्य करीत असली तरी जगात जगण्याची दृष्टी त्या मुलाला शिक्षक देतो,त्यामुळे शिक्षकाचे महत्व किती अधोरेखित आहे. हे टिकवून ठेवायची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे प्रतिपादन समेलनांध्यक्ष व नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाचे संचालक प्रा.वामन केंद्रे यांनी केले.ते गोंदिया येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या ऑडोटोरियममध्ये आयोजित ८ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य समेलनाच्या समेलनाध्यक्ष स्थानावरून आज रविवारला बोलत होते.
या समेलंनाचे अधिकृत उदघाटन उदघाटक माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते घटांनाद करुन करण्यात आले.त्यावेळी विचारमंचावर विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार,समेंलनाध्यक्ष प्रा.वामन केंद्रे,शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील,अतूल देशंमुख,माजी आमदार राजेंद्र जैन,माजी मंत्री अनिल देशमुख,प्रभाताई गणोरकर,कवियत्री निरजा,स्वागताध्यक्ष प्रा. राजेंद्र झाडे,नवनाथ गेंड,लोककवी अरुण म्हात्रे,मावळते समेलनांध्यक्ष जयवंत पाटील,माजी आमदार राजू तिमांडे,अनिल बानवकर,नाना पंचबुध्दे,आमदार प्रकाश गजभिये,विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.पाहुण्यांचे स्वागतगिताने स्वागत करून समेलनाची सुरवात राष्ट्रगीताने करण्यात आली.
पुढे बोलतांना समेलनांध्यक्ष प्रा.केंद्रे म्हणाले की,शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील हे शिक्षकांच्या ध्येयासाठी लढणारे व झटणारे व्यक्तिमत्व असून देशात शिक्षकांचे साहित्य समेंलन घेणारे एकमेव व्यक्ती आहेत.शिक्षकांना अभ्यासक्रमातील पुस्तकांव्यतिरिक्त वाचनछंद वाढविण्याची गरज आहे.शिक्षक कुणीही होऊ शकत नाही,त्यासाठी त्या व्यक्तिच्या अंगात शिक्षकाला हवे असलेले गुण असावे लागतात.अपवादात्मक परिस्थितीतच आत्मपरिक्षण न करणाराही शिक्षक होऊन जातो.शिक्षकांनी शिक्षणाला व्यवसायाचे रुप न देता प्रबोधनासह जनजागृतीचा मार्ग गृहीत धरुन आजूबाजुच्या व्यक्तिंना जिवन जगण्याचा मार्ग दाखविणारा व्यक्ती जिवनाला रंग देऊ शकतो अशी ताकद असणारा शिक्षक होय.आजच्या परिस्थितीत प्राथमिक पासून तर उच्चशिक्षणापर्यंतचा शिक्षक हा नोकरी टिकवायची आहे या पातळीवर जेव्हा विचार करतो,तो विचार देशाच्या प्रगतीला मारक आहे.उलट शिक्षकांने आपल्याकडील ऊर्जेचा वापर करुन सक्षम व्यक्ती व विद्यार्थी घडविण्यासाठी केला पाहिजे.दुभंगलेल्या समाजाला जोडण्याचे काम करायचे आहे.तर आपल्या आजुबाजुच्या वास्तव्यपरिस्थितीला घेऊन समाजात सवांदाचे काम करुन समाजाच्या जबाबदाèया सांभाळावे लागणार आहे.आज आपल्या देशात शिक्षणावर फक्त ०.२ टक्के निधी खर्च केला जातो हे योग्य नाही,शिक्षणावर देशाच्या सुरक्षितेतेसाठी जेवढा खर्च होतो त्यासारखा किमान १५ ते १६ टक्के निधी खर्च होणे गरजेचे आहे.
यावेळी आपल्या उदघाटकीय भाषणात बोलतांना खासदार प्रफुल पटेल म्हणाले की,शिक्षणाचे महत्व मोेठे असून झपाट्याने काळ बदलत चालला आहे.त्याप्रमाणे आपल्याला शिक्षण पध्दतीमध्ये बदल करुन जगाच्या स्पर्धेत कसे टिकता येईल या शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे.आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जग एवढे आपल्या जवळ आलेले आहे की,मुंबईच नव्हे तर विदेशात काय घडते ते आपणास क्षणार्धात कळते.आपले साहित्य समेलंन ज्या भागात होत आहे,त्या भागातील झाडीपट्टी संस्कृतीला एक वेगळे महत्व आहे.आमच्या या संस्कृतीनेही बदलत्या काळानुसार आपले कार्यक्षेत्र वाढविण्याचे काम साहित्याच्या क्षेत्रात केले आहे.गेल्या ३०-३५ वर्षात झपाट्याने बदल झाले असून इंटरनेट क्रांती झाली आहे.या क्रांतीमध्ये आपली संस्कृती व साहित्याचा मात्र लोप होता नये याची काळजी घेण्याची जबाबदारी शिक्षकांची असून शिक्षक भारती हे काम अशा शिक्षक साहित्य समेलनाच्या माध्यमातून करीत असल्याचे उदगार काढले.त्यातच शरद पवार साहेब हे शिस्त व वेळेला महत्व देणारे नेते असल्याने त्यांची ओळख देशात जाणता राजा म्हणून आहे असे व्यक्ती या समेलंनाला उपस्थित झाल्याने या संमेलनाचेही महत्व वाढल्याचे म्हणाले.
प्रास्तविकात कवियत्री निरजा म्हणाल्या की पटेलामुळे मुंबई ते गोंदिया प्रवास झाला. पवाराच्या हस्ते १९९८ ला मी पहिला काव्यपुरस्कार स्विकारला कर्मकांड व चुकीच्या परपंरा म्हणजे संस्कृती नव्हे विचाराची प्रबोधनात्मक क्रांती व्हावी यासाठी फातिमा व सावित्रीबाईचा विचारांचा आदर्श घेऊन शिक्षक भारती काम करत आहे.शिक्षक कर्मकांडाला स़स्कृती मानतात परंतु येथे आलेले शिक्षक हे पुरोगामी विचाराचे असून पिढी घडविण्याचे काम करीत असल्याची माहिती दिली.यावेळी खासदार शरद पवार यांच्या हस्ते साहित्य समेंलनाच्या विशेषकांचे विमोचन करण्यात आले.उदघाटकीय सोहळयानंतर कविसमेंलनाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात श्रीधर नांदेडकर,उषा किरण आत्राम,पद्मरेखा धनकर,विजया मारोतकर,लखनसिंह कटरे,भुपेशकुमार पाटील,शोभा कऊटकर,चित्रा कहाते आदी कवि सहभागी झाले होते.त्या कवी समेंलनाचे सुत्रसंचालन लोककवी अरुण म्हात्रे यांनी केले.त्यानंतर शिक्षक साहित्य समेंलनाचे सुप वाजले.