गडचिरोली जिल्ह्यात किरसान मिशनतंर्गत जनसंपर्क अभियान

0
11

गडचिरोली,दि.27ः- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असलेले सेवानिवृत्त राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व आदिवासी समाजसेवक डाॅ.नामदेवराव किरसान यांनी डॉ. किरसान मिशन लोकसभा जनसंपर्क अभियान सुरु केले आहे.या अभियानंतर्गत त्यांनी लोकसभा मतदारंघातील चामोर्शी,गडचिरोली,आष्टी आदी भागातील काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकार्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेण्यास सुरवात केली आहे.सोबतच गडचिरोली येथे विधानसभेचे उपनेते व आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांची निवासस्थानी भेट घेऊन मतदारसंघातील विविध विषयावर तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा केली. किरसान यांनी चामोर्शी येथे जिल्हा व तालुका कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकार्यांच्या भेटी घेऊन लोकसभा निवडणुकिच्या अनुषंगाने चर्चा केली.त्यांनी जिल्हा महासचिव रियाज भाई शेख,जिल्हा उपाध्यक्ष राजेश ठाकुर,जिल्हा महासचिव सुरेश भांडेकर,तालुका अध्यक्ष विनोद खोबे,तालुका उपाध्यक्ष पंकज भिसॆ, दिपक नेताम, सुखदेव नेताम, रमेश सोनटक्के यांच्याशी चर्चा केली. चामोर्शी तालुक्यातीलच अनखोडा (आष्टी)काँग्रेसचे जेष्ठ नेते भगिरथ पाटील यांची भेट घेत डॉ. किरसान यांनी सध्याच्या राजकिय परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. या प्रसंगी शंकरपाटील मारशेट्टीवार माजी पोलीस पाटील आष्टी, काशीनाथ गलबले आदी कार्यकर्ते हजर होते.