राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी लखनसिंह कटरे

0
10

गोंदिया,दि.27ः-सरकारच्या मराठी भाषा विभागाने  महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची पुनर्रचना केली असून, या मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती केली आहे.सोबतच अन्य ३५ जणांची नियुक्ती मंडळाचे सदस्यपदी करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने बुधवारी मुंबईत घेतला.त्यामध्ये महाराष्ट्रातील शेवटच्या टोकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टी व पोवारी संस्कृती भाषेचे लेखक,कवी,अभ्यासक सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक लखनसिंह कटरे यांची निवड केली आहे.विशेष म्हणजे गोंदियासारख्या आदिवासी,नक्षलग्रस्त झाडीपट्टीतील जिल्ह्यातून पहिल्यांदाच राज्य साहित्य संस्कृती मंडळावर कुणाला संधी मिळाली असेल.कटरे यांच्या निवड्डीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.त्यांच्या निवडीमूळे पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर आयोजित अखिल भारतीय पोवारी साहित्य संस्कृती साहित्य समेंलनालाही आत्ता अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

मंडळाचे अध्यक्ष नियुक्त झालेले डॉ. मोरे यांनी यापूर्वी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात तत्त्वज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य केलेले आहे.त्यांच्यासोबतच या समितीवर साहित्यिक विजय पाडळकर, भारत सासणे, श्रीमती सिसिलीया कार्व्हालो, उत्तम बंडू तुपे, अरुण शेवते, गिरीश प्रभुणे, चित्रपट समीक्षक अशोक राणे, संगीतकार संदीप खरे, डॉ. मार्तंड कुलकर्णी, श्रीमती फरझाना डांगे. सुनीलकुमार लवटे, कवी रेणू पाचपोर, डॉ. मधुकर वाकोडे, आसाराम कसबे आदींचा समावेश आहे.तर अन्य सदस्यांमध्ये ज्योतीराम कदम, आशुतोष अडोणी, रवींद्र गोळे, उमा कुलकर्णी, सुप्रिया अय्यर, डॉ, विद्या पाटील, उषा परब, राणी दुर्वे, सुधीर पाठक, ए. के. शेख, जगन्नाथ शिंदे, अशोक सोनावणे, डॉ.रणधीर शिंदे, लखनसिंह कटरे, पत्रकार अरूण करमकर, शंकर धडके, संजय ढोले, देवीदास पोटे, रमेश पवार, डॉ. उत्तम रूद्रावतार आदींचा समावेश आहे. या समितीची मुदत राज्य साहित्य, संस्कृती मंडळाच्या आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्ष अथवा राज्य सरकारचा पुढील आदेश होईपर्यंत असेल असे मराठी भाषा विभागाने स्पष्ट केले आहे.