मुख्य बातम्या:

गुलाबी थंडीत रंगले झाडीबोलीतील अस्सल कवी संमेलन

आमगाव,दि.31ःः तालुक्यातील बोरकन्हार येथे दोन दिवसीय 26 वे झाडीबोली साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले असून झाडीपट्टीतील विविध जिल्ह्यातून आलेल्या झाडीपट्टीतील कवी/ कवयित्री यांनी भर गुलाबी थंडीत दर्जेदार कविता सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कवी संमेलनात महाराष्ट व मध्यप्रदेश अश्या दोन रााज्यातील २२ कवीची उपस्थिती होती. प्रेम, पत्नी, आई, वडील, सामजकारण, राजकारण, समस्या, आंतंकवाद, नक्षलवाद, देशभक्ती अश्या विविध विषयांवर गझल, गीत, शेरोशाहीरी सादर करीत गीत व कविता सादर केल्या.
कवी संमेलन प्रसंगी अध्यक्षस्थानी पूर्वाध्यक्ष बंडोपंत बोढेकर होते तर २६ व्या संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे, झाडीपट्टीची बहिणाबाई अंजनाबाई खुणे, सुशीलकुमार खापर्डे, चंदूभाऊ पाथोडे उपस्थित होते.
कविसंमेलनाला बहारदार करण्यासाठी राजन जयस्वाल, मधुकर गराटे, पवन पाथोडे, देवेंद्र रहांगडाले, सुशीलकुमार खापर्डे इंद्रकला बोपचे, दिवाकर मोरस्कर, डोमा कापगते, दौलत खां पठान,देवेन्द्र चौधरी, सुरेश रहांगडाले, लोकराम शेंडे, किरण मोरे, या कविंनी कवितांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक अश्विन खांडेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुशिलकुमार खापर्डे यांनी मानले.काव्यसंमेलनात २२ कविंची रंगली मैफील बोरकन्हार येथे आयोजित २६ व्या झाडीबोली साहित्य संमलनात ३० डिसेंबर रोजी
दुपारी १.३० वाजता पासून सुरू करण्यात आलेल्याकवी संमेलनाचे बहारदहार संचालन डॉ. संतोष मुजुमदार यांनी केले.

Share