कत्तलखाण्यात जाणाºया जनावरांच्या ट्रकला पकडले

0
24

गोंदिया,दि.31: गोरेगाव तालुुक्याच्या मुंडीपार येथे २८ डिसेंबरच्या रात्री २३.३० वाजता एमएच ३६ एफ ३२८९ या ट्रकमध्ये २० गाई व २२ गोरे असे ४२ जनावरे डांबून कत्तलखाण्यात वाहतूक करीत असता इंदिरानगर गोरेगाव येथील कदीर खालीफ शेख (३१) यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी कारवाई करून कत्तलखाण्यात जाणाºया त्या जनावरांना चारा-पाणी न देता वाहतूक करीत असता त्या ट्रकला पकडण्यात आले. सदर घटनेसंदर्भात चार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. याात आरोपींमध्ये ओमप्रकाश अंताराम ढवळे (२६) व पदीम मोबीन शेख, बाबू पटेल तिन्ही रा. रा. रामभाऊ वॉर्ड अड्याळ ता. पवनी जि.भंडारा व फरीद साहाब कुरेशी रा. टेकानाका नागपूर या आरोपींविरूध्द प्राण्यांना निर्दतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१) (ड) (ई) सहकलम ७, ९ महाराष्टÑ पशूसंवर्धन अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ७ लाख ४६ हजार रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.