रेल्वेच्या थांब्यासाठी सालेकसावासियांचे निवेदन

0
21
सालेकसा,,दि.३१ः सालेकसा रेल्वे स्थानकावर दुपारच्या ट्रेन साठी गावकऱ्यांनी स्टेशन प्रबंधककडे निवेदन दिले.अकरा वाजता लोकल ट्रेन गेल्यानंतर सरळ सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी शालिमार एक्सप्रेस ट्रेन आहे.या मध्यकाळात गोंदिया ते रायपूर मार्गावर कुठल्याही ट्रेनची सुविधा नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. तसेच डोंगरगड ते गोंदिया मार्गावर सकाळी दहा वाजता शालिमार एक्सप्रेस नंतर सायंकाळच्या लोकल शिवाय पर्याय उपलब्ध नाही. दुपारी जवळपास पाच तास अप आणि डाउन दोन्ही मार्गावर कुठल्याही ट्रेनची सुविधा नसल्याने प्रवाशांना स्टेशनवरच खोळंबत बसावे लागते. सालेकसा तालुक्याच्या मुख्य ठिकाण सालेकसा तालुक्याच्या मुख्य स्थान असून यामध्ये मोठी बाजारपेठ सर्व शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालये शाळा महाविद्यालये असून, सालेकसा या गावाला आणि सालेकसा रेल्वेस्थानकाला रेल्वे प्रशासनाकडून नेहमी दुय्यम स्थान दिले गेले आहे. करिता गावकऱ्यांनी दुपारच्या ट्रेनच्या थांबा मिळावा म्हणून निवेदन दिले. नागपूर विभागीय मंडळ, बिलासपूर विभागीय मंडळ ह्यांना ह्या मार्फत निवेदन देण्यात आले.निवेदन देताना बाजीराव तरोने, सुनील असाटी, राहुल हटवार, ब्रजभूषण बैस, संजय उके, सुरेश कुंभारे, मनीष लिल्हारे , तरुण मसराम, स्वप्नील करवाडे, रमेश करवाडे, गोपाळ उपादृष्टा , स. शी. लिल्हारे व इतर नागरिक उपस्थित होते.