एकनाथ मोरे यांना मातृशोक

0
22

नांदेड,दि.03ः- माजी सनदी अधिकारी तथा सिनेअभिनेते एकनाथ उर्फ (अनिल ) मोरे रायवाडीकर ता. लोहा यांच्या मातोश्री मुक्ताबाई सटवाजी पा. मोरे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८२ व्या वर्षी (दि.२ जानेवारी)बुधवारी रात्री ८:२० वाजता निधन झाले.त्यांच्यावर आज 3 जानेवारीला सायकांळी 3 वाजता रायवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
रायवाडीचे माजी सरपंच, प्रगतशिल शेतकरी, व वारकरी संप्रदायाचे निस्सीम भक्त सटवाजी पा. मोरे यांच्या सोबत मुक्ताबाई धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय राहून रायवाडीचा विकास करण्यासाठी परीश्रम घेतले.अत्यंत प्रेमळ, मनमिळाऊ व उदार अंतःकरणाचा स्वभाव आसल्याने गावातील लहान थोर , गोरगरिबांच एक आश्रय स्थानं होतं . त्यांनी दहा वर्ष सरपंच पद भुषवुन अनेक उपक्रम राबवले व ग्रामविकासात सक्रिय भाग घेतला. नंदिकेश्वर च्या आशीर्वादाने आपल्या दोन मुलांना उच्च विद्याविभूषित करून समाजकार्यास हातभार लावला. सामन्याचा आधार गेला असेच म्हणावे लागेल.

त्यांच्या पश्चात दोन मुले , एकनाथ उर्फ (अनिल ) मोरे , डी.वाय. एस.पी. सोपान मोरे , चार मुली गंगाताई पवार, शोभाताई तेलंग , चंदा भानपूरकर , सुलोचना वडाळकर , तसेच जावई मधुकर तेलंग आंबुलगेकर , डॉ.उमाकांत घोगरे भानपूरकर , संग्राम पा. पवार चितळीकर , नातवंडे असा मोठा परिवार आहे .