विदर्भ राज्य निर्माण यात्रेचे भंडार्‍यात आगमन

0
9

भंडारा,दि.06:विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आयोजित विदर्भराज्य निर्माण यात्रेचे भंडार्‍यात शनिवारी (ता.५) उमरेड- भिवापूर मार्गे मुख्य संयोजक रामभाऊ नेवले यांच्या उपस्थितीत आगमन झाले. ३ वाजता पवनी येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर लाखांदूर, ५ वाजता साकोली, सायंकाळी ७ वाजता लाखनी येथे सभा व रात्री भंडारा येथे मुक्काम राहणार आहे.आज रविवारी (दि.६) सकाळी ११ वाजता पत्रपरिषद, दुपारी १२.३0 वाजता मोहाडी, २ वाजता आंधळगाव व ३.३0 वाजता तुमसर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निर्माण यात्रेत सहभागी होऊन सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष देविदास लांजेवार व कोरकमेटी सदस्य प्रा. भगवान झंझाड यांनी केले आहे.