लाखनी येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

0
14

स्वप्नपूर्ती फॉउंडेशन व विवेकानंद वाचनालयाचा उपक्रम.

लाखनी,दि.10ः- स्वामी विवेकानंद जयंती “युवा दिन” आणि राजमाता जिजाऊ जयंती प्रित्यर्थ स्वप्नपूर्ती फाउंडेशन आणि विवेकानंद सार्वजनिक वाचनालय लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने लाखनी येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धा दिनांक १२ जानेवारी २०१९ रोज शनिवारला दुपारी २ वाजता राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय लाखनी येथे आयोजित केली असून स्पर्धा दोन गटात आहे. ‘अ’ गटात लहान मुले ते इयत्ता ६ वी पर्यन्तचे विद्यार्थी राहतील तर ‘ब’ गटात इयत्ता ७ वी पासून इतर सर्व विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. दोन्ही गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जातील. सदर स्पर्धेसाठी आदर्श माता राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराजांचे गडकील्ले, शिकागो धर्मपरिषदेतील एक क्षण, शाळा, शिवाजी महाराजांची तलवार, माझ्या स्वप्नातील भारत हे विषय ठेवण्यात आले आहेत तसेच स्वेच्छेनुसारही चित्र काढता येईल.
स्पर्धेच्या अधिक माहीतीसाठी व नोंदणीसाठी प्रशांत वाघाये (8275397380), अजिंक्य भांडारकर (9420366006), सुधीर काळे, आशिष बडगे, बाबुरावजी निखाडे, हेतलाल पटले, अक्षय मासुरकर, आशिष राऊत, कृष्णा उइके यांच्याशी विद्यार्थ्यांना संपर्क साधावा असे आवाहन स्वप्नपूर्ती फाउंडेशन व विवेकानंद वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.