मनसेच्यावतीने ठाणा येथे प्रवाशी निवाऱ्याची सोय

0
15

आमगाव,दि.१०ःः तालुक्यातील ठाणा येथे (दि.08) रोजी आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमप्रसंगी प्रवाशांच्या सोयीसाठी मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी व जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे यांच्या उपस्थितीत प्रवाशी निवार्याची सोय करण्यात आली.येथून तालुका व जिल्हामुख्यालयाला शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना प्रवाशी निवारा नसल्याने उघड्यावर  उभे राहावे लागत होते.

मनसेचे जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी हे कार्याक्रमानिमित्त दिवाळीत ठाणा येथे आले असता गावकरी,विद्यार्थीनी या ठिकाणी प्रवाशी निवाऱ्याची सोय नसल्यामुळे जनतेला बसची वाट बघताना त्रास सहन करावे लागत असल्याची अडचण सांगितली.तेव्हा मनसे अध्यक्ष मनिष चौरागडे यांनी आधी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे मागणी करा त्यांनी नाही केले तर मी प्रवाशी निवारा उभारुन देणार असे आश्वासन दिले होते.त्यानुसार जानेवारी महिन्यात या प्रवाशी निवार्याचे लोकार्पण करण्यात आले.विशेष म्हणजे या गावात पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य असतांनाही त्यांना दुर्लक्ष केले तरआमदार खासदारकीचे डोहाळे लागलेले नेते सुध्दा या गावी येऊन गेले तरीही त्यांनी मागणी पुर्ण केली नाही.

प्रवाशी निवाऱ्याचे लोकार्पण निमित्त साधून रक्तदान शिबिराचे कार्यक्रम मनसेच्या वतीने घेण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी होते.तर उदघाटक म्हणून मनीष चौरागडे उस्थितीत होते.यावेळी वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष हेमंत लिल्हारे,जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना गवळी, अध्यक्ष उमेश चतुर्वेदी.गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे.उपतालुका अध्यक्ष चंद्रशेखर धुवारे,जिल्हा परिषद सदस्य शोभेलाल कटरे,सरपंच अनिता आगरे यावेळी उपस्थित होते.आयोजनासाठी नितेश महारवाडे ठाणा शाखा प्रमुख सुरेंद्र उके,प्रशांत देशकर,नोकलाल रसनकुटे,गोपाल पाऊलझगडे,अनमोल बाजपाई,योगेश मेश्राम,गणेश मेहर,अनिल आग्रे,आकाश पारधी, अक्षय ठाकरे,धर्मराज चणाप,खुमरवजी बनकर,राजेश सोनवणे,अरुण मेश्राम,गजानन नागरिकर, मोतीराम खोटेले,रवींद्र खोब्रागडे,विनोद भेदे,इसुलाल निनावे,राजकुमार मेश्राम,विनायक मेश्राम,भारत नागरिकंर व कार्यकर्ता उपस्थित होते.