अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या निणर्याची अंमलबजावणी करू

0
32

नवेगावबांध,दि.11 : पदवीधर अंशकालीन उमेदवारांबाबत आमचे सरकार सकारात्मक असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने लवकरच शासकीय अध्यादेश काढणार आहेत. या निणर्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करु अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्वावर नोकरीची संधी उपलब्ध करुन देऊन मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना जिल्हा शाखेतर्फे शनिवारी (दि.५) बडोले यांचा सडक अर्जुनी येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. बडोले यांनी पदवीधर अंशकालीन कर्मचाºयांच्या अडचणी दूर करण्याची ग्वाही दिली.
या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत सावळकर, कार्याध्यक्ष संजय लदरे, जिल्हा सचिव राजेंद्र खोब्रागडे, तालुकाध्यक्ष घनशाम खरवडे, सूर्यप्रकाश भास्कर, दामोधर खोब्रागडे, एकनाथ लंजे, रतन खोब्रगडे, सिद्धार्थ उंदीरवाडे, रमेश यावलकर, सरोज हुमे, जगदीश मेंढे, शारदा थोटे व आठही तालुक्याचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन दामोदर खोब्रागडे यांनी केले तर आभार सतीश कोसरकर यांनी मानले.