मुख्य बातम्या:
प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हाच आपला ध्येय-आ.अग्रवाल# #ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीत अर्ज करणाèया शिक्षकामुळेच इतरावंर अन्याय# #ओबीसीच्या जनगणनेसाठी लढा हाच पर्याय-डाॅ.ज्ञानेश्वर गोरे# #बोदलबोडी-भजेपारला जोडणार्या वाघनदीवर होणार ६ कोटीचा पुल# #अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना २९ जूनपर्यंत अर्ज आमंत्रित# #महाराष्ट्राच्या बजेटमध्ये ओबीसींसाठी अंदाजे 20 हजार कोटींची तरतूद करावी : आमदार गजभिये# #वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांना सहकार्य करु नये- वनविभागाचे आवाहन# #२२ जूनला सडक/अर्जुनी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन# #शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय मुलांचे भविष्य घडणार नाही- गुणवंत पंधरे# #नागनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी किती आंदोलने करावी?

भाजपाचे विकासकामांना महत्त्व – आ.फुके

गोंदिया,दि.11 : विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपचे पुढारी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. गेल्या ४ वर्षात शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून विकासकामे होत आहेत. भाजपने कधीही विकासाचे सोंग केले नाही. किंबहुना विकासाच्या पोकळ बोंबा सुद्धा मारल्या नाहीत, तर विकास कामांनाच महत्त्व दिले, असे प्रतिपादन आ. डॉ. परिणय फुके यांनी केले.
जवळील कुडवा येथे २५/१५ योजनेअंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंचा श्यामदेवी संजू ठाकरे होत्या. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, भाऊराव उके, छत्रपाल तुरकर, शिव शर्मा, लिमेंद्र बिसेन, मुजीब पठाण, नरेंद्र तुरकर, कुणाल बिसेन, प्रभाकर ढोमणे, प्रदीप ठाकरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
आ. फुके पुढे म्हणाले, केंद्र व राज्य सरकार मागील ४ वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला प्राथमिकता देत विविध योजना व विकास कामे घडवून आणत आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत .जे काम गेल्या ७0 वर्षात झाले नाही ते भाजप सरकारच्या माध्यमातून मागील ४ वषार्पासून सातत्याने केले जात आहे. यावेळी विनोद अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांपर्यत लोकोपयोगी योजना पोहोचविण्याचे काम आपण करीत असून खोट्या विकासाच्या बाता करणार्‍या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भूलथापांना बळी न पडता, विकास करणार्‍या व्यक्तींच्या पाठीशी नागरिकांनी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

Share