सावित्रीबाईने दिलेल्या शिक्षणाचा योग्य वापर करा-डॉ.माधुरी झाडे

0
28

गोंदिया,दि.11: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु करुन मुलींना स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. या शिक्षणामुळे आज महिलांची बरीच प्रगती केलेली आहे. त्यांच्यात आमुलाग्र असा बदल झालेला आहे. परंतु अजूनही महिलांना त्यांच्या शिक्षणाचा योग्य वापर करता आला नाही असे डॉ. माधुरी झाडे यांनी मत व्यक्त केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले फालोअर्स महिला संगठन गोंदिया यांच्यातर्फे सावित्रीबाई फुले यांचा जयंती कार्यक्रम ३ जानेवारी रोजी स्थानिक इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. माधुरी झाडे बोलत होत्या. उदघाटक म्हणून प्रथम महिला बिल्डर सेफाली कान्ट्रक्शनच्या रिता पोटेफोसे होत्या. मुख्य मार्गदर्शक अपर्णा बिरणवार लोधी, जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे, विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तरुणांच्या प्रेरणास्त्रोत स्नेहल गणवीर, तनेस मोटार सायकल नी एकटीने संपूर्ण भारत भ्रमण करणारी पहिली महाराष्ट्रीयन तरुणी यांनी युवा वर्गाचे प्रतिनिधीत्व केले. डॉ. माधुरी झाडे पुढे म्हणाल्या की महिलांनी आपल्यातील सुशिक्षीत अडाणीपणा दूर करावा. महिलांनी अंधश्रद्धेतून दूर रहावे व इतरांनाही प्रेरित करावे. पाश्चात्य संस्कृतीचे अवलंबन करताना त्यांच्यातील दोष सुद्धा तपासून पहावे. आजच्या तरुण पिढीचे डी.जे.च्या नादी लागून वेळ व पैसा वाया घालविण्यापेक्षा अभ्यास व वाचन करुन आपली प्रगती करावी. तसेच लग्नावर वोरमाप खर्च करण्यापेक्षा साधेपणाने लग्न लावावेत. लग्नाकरिता कर्जबाजारी होवू नये.
अपर्णा बिरणवार लोधी यांनी आपल्या आजचे युग हे कलियुग नसून कलम युग आहे. प्रत्येकाने याची जाणीव ठेवून आपल्या भविष्य उज्जवल करण्याकरिता या लेखीणीचा योग्य तो वापर करावा असे संबोधित केले. युवा ऑयकान स्नेहल गणवीर यांनी मुलींनी स्वत:ला कमजोर समजू नये, मुलींनी आपले संरक्षण करण्याकरिता वैयक्तिक संरक्षणाचे धडे घ्यावीत. मुलींना बंधने घालणाèयांनी त्यांच्या मुलांनाही काही समज दयावी जेणेकरुन समाजात पसरत असलेल्या दृष्यकृत्या आळा बसेल असे मत व्यक्त केले. संगठनाच्या समन्वयक वैशाली खोब्रागडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले फालोअर्स महिला संगठन, गोंदियाची स्थापना, उद्देश, मागील जयंतीपासून आतापर्यंत संगठनामार्फत केलेली कामे व संगठनाच्या पुढील वाटचालीबद्दल कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून माहिती दिली. तसेच मंचासीन सर्व अतिथींचा परिचय सविता उके यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून करुन दिला.
मार्गदर्शनाच्या कार्यक्रमानंतर दुसèय टप्प्यामध्ये सिमा पाटील व जॉली मोरे मुंबई यांचा जिजाऊ, सवित्रीबाई, रमाई व अन्य महापुरुषांचे विचार पोवाडा व शाहीरी बाण्यातून संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपस्थितांनी यास भरपूर प्रतिसाद देवून कार्यक्रम सफल केला. जयंती कार्यक्रमास शहरातील व परिसरातील पन्नासपेक्षाही जास्त बुद्ध विहारांचे प्रतिनिधी व परिसरातील ५००० पेक्षा अधिक जनसमुदाय उपस्थित होता. संचालन समता गणवीर, अ‍ॅड. एकता गणवीर यांनी केले. आभार ज्योती डोंगरे व अ‍ॅड. प्रज्ञा डोंगरे यांनी मानले.