मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांचे 18 वे *शैक्षणिक संमेलन* शनिवारला

गोंदिया,दि.11:—अखिल महाराष्ट्र व विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे सी सलग्न गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघ व गोंदिया तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने 18वे जिल्हास्तरीय मुख्याध्यापकांचे शैक्षणिक संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.संमेलनाचे आयोजन उद्या 12 जानेवारी ,शनिवारी सकाळी 10.30 वाजे पासुन स्व.शोभादेवी विद्यालय व मयुर विज्ञान कनिष्ठ महा विद्यालय टेमणी(गोंदिया)येथे करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आमदार गोपालदासजी अग्रवाल राहणार आहेत.उद्घाटन खासदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते होणार आहे.स्वागताध्यक्ष माॅ रेणुका बहु.शिक्षण संस्था गोंदिया चे सचिव श्यामभाऊ चंदनकर आहेत.विशेष अतिथी म्हणुन आमदार संजय पुराम,शिक्षक आमदार ना.गो.गाणार,गोंदिया जिल्हा को.ऑप.बॅकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले,नागपुर बोर्डाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे,नागपुर विभागाचे शिक्षण उपसंचालक सतिश मेंढे,राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मारोतराव खेडेकर,राज्य सचिव नंदकुमार बारवकर,राज्य सदस्य नरेंद्र वाळके,विदर्भ मुख्या.संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर,सचिव सतिश जगताप,जिल्हा परीषद गोंदिया चे शिक्षण सभापती रमेश अंबुले, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे,प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड,माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी सुनिल मांढरे,विदर्भ मुख्या.संघाचे कार्याध्यक्ष अशोक. पारधी,कोषाध्यक्ष राजकुमार बालपांडे,संघटन सचिव अनिल बाळसराप उपस्थित राहणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणुन जि.प.सदस्या खुशबु टेंभरे,पं.स.सदस्य अखिलेश सेठ,गोंदिया प.स.चे गटशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी,टेमणी च्या सरपंच श्रीमती खेलनताई टेकाम,उपसरपंच शिवलाल नेवारे उपस्थित राहणार आहे.संमेलंना दरम्यान शैक्षणिक समस्या,गुणवत्ता वाढी स्तव उपाय योजना ई.विषयावर चर्चा होणार आहे.जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना अधिवेशन स्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष रमेश तणवाणी,जिल्हा कार्यवाह बी.डब्लु.कटरे ,जिल्हा कार्याध्यक्ष दुर्गाप्रसाद पटले,गोंदिया तालुका अध्यक्ष बी.पी.बिसेन,कार्यवाह डी.बी.गेडाम आदिंनी केले आहे.

Share