साहित्यिकांच्या मुस्कटदाबीच्या निषेधार्थ यवतमाळात काँग्रेस कमिटीचे मूक आंदोलन

0
15

यवतमाळ,दि.11: अ.भा. संमेलनासाठी साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण सत्ताधाऱ्यांच्या दबावात नाकारण्यात आले. ही साहित्यिकांची मुस्कटदाबी असल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीने महात्मा ज्योतिबा फुले पुतळ््याजवळ आज शुक्रवारी सकाळी मूक धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटी, यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी, यवतमाळ महिला जिल्हा काँग्रेस, जिल्हा युवक काँग्रेस, एनएसयुआय, जिल्हा काँग्रेस सेवादल, कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभाग आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केले.

साहित्य संमेलनाला पक्षाचे समर्थन असून साहित्यिकांना कोणताच विरोध नाही. परंतु, शासनाच्या दबावाने एखाद्या महिला साहित्यिकाचा अपमान झाल्याच्या निषेधार्थ आणि शासनाच्या दडपशाहीचा विरोध करण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी दिली.या आंदोलनावेळी काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, बाळासाहेब मांगुळकर, बाबासाहेब गाडे पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्ष माधुरी अराठे, यांच्यासह यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.