५.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त;१४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी

0
10

गोंदिया,दि.12ः- स्थानिक कुडवा नाका २ कि.मी. अंतरावरील एचडीएफसी बँकेचे एटीएम मध्यरात्री चोरट्यांनी लोखंडी साहित्याने फोडून त्यातील रोख व साहित्य चोरी करून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता रंगेहात अटक करण्यात आली. आरोपींकडून ५ लाख ३५ हजार ६00 रूपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १0 जानेवारीच्या मध्यरात्री दरम्यान घडली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता १४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ट्रक क्र. सीजी 0४/जे ४९७६ चा चालक आरोपी नरेंद्र तेजराम फुंडे (३८), रा. हरीओम कॉलनी छोटा गोंदिया हा मध्यरात्री कुडवा नाका परिसरातील एचडीएफसी बँक एटीएममध्ये ट्रक घेवून पोहोचला. दरम्यान सुना मौका साधून आरोपीने ट्रकच्या कॅ बीनमध्ये ठेवलेल्या लोखंडी साहित्यने एटीएम डोअर लॉक तोडून आत प्रवेश केले. यावेळी एटीएमचा लॉक तुटल्यानंतर सायरनच्या आवाज होताच कर्मचार्‍यांनी रामनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी चोरी केलेला माल ट्रकमध्ये ठेवत असताना त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून तीन सीसीटीव्ही कॅमेरे किंमत ३0 हजार रुपये , एम स्पिकर किंमत १ हजार रुपये, एक एटीएम डोअर लॉक किंमत ३ हजार ५00 रुपये , रोख ५५0 , एक पेचकस किंमत ५0 रुपय , पेंचीस, कटर मशीन व ट्रक असा एकूण ५ लाख ३५ हजार ६00 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. फिर्यादी पोहवा इंदल आडे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता १४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई सहा. पोलिस निरीक्षक अमोल सोनवाने, पोलिस उपनिरीक्षक शुक्ला व डीबी स्टॉप कर्मचार्‍यांनी केली आहे.