मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

फीट हा आजार उपचाराने बरा होतो : डॉ. सूर्या

गोंदिया,दि.14 : ब्रेनमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यास व्यक्तीला फीट येत असते. मात्र, फीट या आजारावर उपचार करून घेतल्यास निश्चितच त्यावर प्रतिबंध घालता येतो. व्यक्तीने त्या संदर्भात वेळीच उपचार करून घेणे आवश्यक आहे. त्यानुरूप या रोगावर उपाय करण्यासाठी विविध शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिराच्या माध्यमातून निश्चितच हा आजार कमी होतो. त्यामुळे या आजाराविषयी कसल्याही प्रकारची भीती मनात ठेऊ नये, अशी माहिती ईिपलेप्सी फाउंडेशन मुंबईचे चेअरमेन डॉ. निर्मल सूर्या यांनी दिली.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत व ईिपलेप्सी फाउंडेशन मुंबइच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालयात १२ जानेवारीला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माहिती देताना ते बोलत होते. फीट या आजाराचे प्रमाण लक्षात घेता १ कोटी व्यक्तीमागे १ लाख रुग्ण या आजाराचे असल्याची माहितीही डॉ. सूर्या यांनी यावेळी दिली. मात्र, हा आजार वेळीच उपाययोजना केल्यानंतर काही दिवसात कमी होणारा आहे. आतापर्यंत ७१ शिबिर घेण्यात आले असून या माध्यमातून २७ हजार रुग्णांची तपासणीही करण्यात आली आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील हे दुसरे शिबिर आहे. या पूर्वी १८ डिसेंबर २०११ ला शिबिर घेण्यात आले होते. यामध्ये ५९२ रुग्णांची तपासणीही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले..

या शिबिराच्या माध्यमातून जवळपास २०० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून अजूनही काही रुग्णांची तपासणी या शिबिराच्या माध्यमातून केली जाणार असून रुग्णांसाठी ३ महिन्यांची औषधी दिली जाणार असल्याचे सांगितले. मागील ८ वर्षांपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा शिबिराचे आयोजन सुरू असून शासनाच्या माध्यमातून या शिबिरामागे ४ लाख ४० हजाराचे अनुदान प्राप्त होते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी अशा शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. .

Share