‘वन बुथ, टेन युथ’ अभियान गावागावात पोहोचवा : जैन

0
8

गोंदिया,दि.18 : राष्ट्रवादी युवक काँग्रेस गोंदिया जिल्ह्याची विशेष सभा नुकतीच गोंदिया येथील राष्ट्रवादी भवानात पार पडली. या सभेमध्ये ‘वन बुथ, टेन युथ’ अभियानाचा शुभारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. राजेंद्र जैन यांनी जिल्ह्यातील युवक राष्ट्रवादीच्या युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्ह्यातील सर्वात शेवटच्या गावापर्यंत हे अभियान पोहोचले पाहिजे व राष्ट्रवादीची युवा शक्ती जिल्ह्यात वाढली पाहिजे. भाजपा सरकारच्या फसव्या योजनाबाबत युवकांनी प्रहार केला पाहिजे. नोटाबंदी, बेरोजगारी, जीएसटी, कर्जमाफी, सीएम चषक इतर मुद्यांवर अभ्यास करून युवकांना जागृत करा, जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन कमीत कमी १० युवकांना सदस्य बनवून त्यांचे ओळखपत्र तयार करा, जिल्ह्यातील गावागावात ‘वन बुथ, टेन युथ’ अभियान पोहोचवा, असे आवाहन राजेंद्र जैन यांनी केले. .

कार्यक्रमाला जिल्ह्यातील युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्तावना जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे यांनी केले. संचालन गोंदिया तालुका अध्यक्ष जितेश टेंभरे यांनी केले. कार्यक्रमाला सालेकसा कार्याध्यक्ष निकेश गावळ, आमगाव तालुकाध्यक्ष तिरथ येटरे, गोरेगाव तालुकाध्यक्ष राजकुमार बोपचे, स/अर्जुनी तालुकाध्यक्ष दिनेश कोरे, तिरोडा कार्याध्यक्ष डॉ. निम्रोध पटले, तिरोडा तालुकाध्यक्ष देवेंद्र चौधरी, वासीम शेख, शिवाजी गहाणे, निप्पल बरैय्या, आशिष येरणे व मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. यावेळी किशोर तरोणे म्हणाले, येणाऱ्या काळात प्रत्येक तालुक्यात सभा घेऊन युवक राष्ट्रवादी अजून बळकट करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. .