स्वच्छतेचा महाजागर प्रबोधनकार करणार

0
8

गोंदिया,दि.18 : राज्यातील ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या संदर्भात जनतेत जास्तीत जास्त जागृती करण्यासाठी या कार्यक्रमाची जबाबदारी वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून प्रबोधनकार, कीर्तनकार मंडळींवर सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या अनुषंगाने गोंदिया जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन विभागाच्या वतीने जि.प. गोंदिया हॉलमध्ये जिल्ह्यातील प्रबोधनकारांची बैठक घेऊन प्रबोधनाबद्दल माहिती देण्यात आली.बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड हे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख मार्गदर्शक हभप सर्जेराव देशमुख महाराज अकोला तर प्रमुख अतिथी वाकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर व जिल्ह्यातील प्रबोधनकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. .

हे प्रबोधनकार गावागावात जाऊन सरकारच्या स्वच्छ भारत अभियानासंबंधी जनजागृती करणार आहेत. हा कार्यक्रम २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत सबंध राज्यात स्वच्छतेचा जागर कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्रात स्वच्छ भारत अभियान उपक्रमाची अंमलबजावणी करून स्वच्छ व सुंदर गाव, निरोगी गाव तयार करण्यासंदर्भात वारकरी साहित्य परिषदेने संपूर्ण महाराष्ट्रात पुढाकार घेतला आहे. याचा योग्य परिणाम देखील दिसून येत आहे. यासाठी राज्यात गोदरीमुक्त अभियानांतर्गत उपलब्ध स्वच्छता सुविधांचे नियमितपणे उपयोग करणे व स्वच्छता नियमांचे पालन करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. पाणीपुरवठा, स्वच्छ विभाग महाराष्ट्र शासन व वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेचा महाजागर प्रबोधनकारांच्या माध्यमातून गावागावात जाऊन करणार आहे. .