पक्षीमित्र संमेलनच्या लोगोचे अनावरण

0
18

चंद्रपूर,दि.22ः- शहरात आयोजित १९ वे पक्षीमित्र संमेलनाच्या लोगोचे काल एका बैठकीत अनावरण करण्यात आले. यंदा इको-प्रो संस्थे तर्फे ९-१0 फेब्रुवारीला चंद्रपूर शहरात विदर्भ पक्षीमित्र संमेलन आयोजित होत आहे. आयोजन बाबत बैठक आयोजित करण्यात आलेली होती या दरम्यान संमेलनाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
चंद्रपूर या गोंडकालीन ऐतिहासिक शहरात आयोजित होत संमेलन असल्याने शहराची ओळख म्हणून लोगोमधे किल्ला-परकोटाची भिंत घेण्यात आलेली असून जिल्ह्याच्या नकाशासह जिल्ह्यातील माळढोक पक्षी व त्याच्या अधिवास संवर्धनाची गरज आणि जिल्ह्यातील एकमेव सारस पक्षी, अधिवासबाबत चिंतन करण्याच्या दृष्टीने, हा लोगो (बोधचिन्ह) लक्ष वेधून घेणारा आहे. पक्षिमित्र संमेलनकरिता लोगो शहरातील प्रसिद्ध चित्रकार सुदर्शन बारापात्रे यांनी तयार केले आहे.
यावेळी सुरेश चोपणे, डॉ. योगेश दुधपचारे, ग्रिन प्लॅनेट सोसायटी, प्रकाश कामडे, सार्ड संस्था, महेद्र राळे, पुथ्वीमित्र पर्यावरण संस्था, मुकेश भांदककर, प्रवीण निखारे, वाइल्ड कैप्चर, आशीष घूमे, इको-प्रो चे बंडू धोतरे, नितिन बुरडकर, बंडू दुधे, नितिन रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.
या संमेलनात विदर्भातील २00 पेक्षा अधिक पक्षीमित्र, अभ्यासक, विविध संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित असून या दोन दिवस चालणार्‍या संमेलनात पक्षी अभ्यासकांचे मार्गदर्शन व सादरीकरण सुध्दा होतील तसेच नवोदितांचे सादरीकरणस सुध्दा संधी राहणार आहे. निवास व्यवस्था, छायाचित्र प्रदर्शन, स्मरणीका प्रकाशन, शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी काही स्पर्धा ई. कार्यक्रम या दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहीती इको-प्रो संस्थेचे वन्यजीव विभाग प्रमुख नितीन बुरडकर व इको-प्रो पक्षि संरक्षण विभाग चे बंडु दुधे, हरीश मेर्शाम यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.